दिनांक २ जुले,२०२४, श्रीगोंदा:
१ जुलै २०२४ पासून नवीन कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली असून, यासंदर्भात जनजागृती अभियानाची सुरुवात श्रीगोंदा पोलीस स्टेशन, अहमदनगरच्या वतीने करण्यात आली आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश भारतीय न्याय संहिता – २०२३, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – २०२३, आणि भारतीय साक्ष अधिनियम – २०२३ या नव्या कायद्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आहे.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर भोसले यांनी नागरिकांना कायद्यांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जनजागृती अभियानाच्या यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी आणि स्थानिक संस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या जनजागृती अभियानाद्वारे नागरिकांना नवीन कायद्यांचे महत्व, त्यांचे पालन करण्याची आवश्यकता, आणि कायद्यांचे उल्लंघन केल्यास येणाऱ्या परिणामांची माहिती देण्यात आली आहे.
अभियानात विविध माध्यमांचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आज श्रीगोंदा शहरातील विवीध ठिकाणी या अभियानाचे आयोजन करण्यात आले. यात श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे pi भोसले, api गोरड, निकम, अभंग, कन्हेरे यांचे सोबत राजु भोर, सचिन गोरे
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




