कोरोना चा फायदा घेत आमच्यावर अन्याय होणार असेल.तर,रस्त्यावर उतरू.:आ.बबनराव पाचपुते

दिनांक २२ मे,श्रीगोंदा:

कुकडी लाभक्षेत्रातील श्रीगोंदा व इतर शेवट च्या भागात उशिरा पाऊस पडतो. ही बाब लक्षात घेऊन पाणी टंचाई दूर करण्यासाठी कुकडी डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामाचे आवर्तन तातडीने सोडावे. कोरोना च्या संकट काळात शांत बसावे लागत आहे.म्हणून, आम्ही अन्याय सहन करू शकत नाही. आमच्यावर पाण्याच्या बाबतीत पुन्हा अन्याय होणार असेल.तर,प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल.असा इशारा माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी दिला आहे.

कुकडी च्या उन्हाळी आवर्तना बाबत पाचपुते यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवून शासनाचे लक्ष वेधले आहे. श्री. पाचपुते यांनी यात म्हटले आहे की, उन्हाळी हंगामासाठी येडगाव धरणात पुरेसा पाणी साठा होण्यासाठी डिंभे डावा कालवा सुरू ठेवणे आवश्यक आहे. माणिकडोह धरणातून नदी द्वारे फीडिंग सुरू करावे. घोड, कुकडी नदीवरील बंधाऱ्याच्या आवर्तनासाठी एक महिना पुरेल म्हणजे २५% पाणीपुरवठा करणे बाबत निर्णय घ्यावा. धरण क्षेत्रात एक जूनला पाऊस सुरू होतो.हे गृहीत धरून माणिकडोह धरणातील अर्धा टीएमसी, पिंपळगाव धरणाचे २.५ टीएमसी व डिंभे धरणातून डाव्या कालव्याद्वारे सतत पाणी मिळण्याचे आदेश व्हावे.

तातडीने आवर्तन सुरू झाल्यास पिण्यासाठी पाण्याचे आरक्षण असलेले कुकडी डावा कालव्या वरील सर्व उदभवांना पाणी उपलब्ध होऊ शकेल. पिंपळगाव जोगे कालवा यासाठी त्वरित सुरू करावा. त्याशिवाय या धरणातील मृत साठ्यातील पाणी काढता येणार नाही. उन्हाळी आवर्तन अंत्यत गरजेचे असून. कुकडी डावा कालव्यावर शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत जगविलेले पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. याची तीव्रता लक्षात घेऊन शेतकऱ्यांना या संकट काळात शासनाने मदतीचा हात देऊन तातडीने आवर्तन सोडावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असे ही पाचपुते यांनी म्हटले आहे.

चारा छावण्याचे बिले मिळावीत..

मागील वर्षी दुष्काळात सुरू असलेल्या चारा छावण्या ची बिले अद्याप शासनाकडून जमा झाली नाहीत. शिवाय छावण्याची रक्कम ही तशीच आहे. एक वर्ष होत आले. जिल्हाधिकारी यांनी तातडीने याचा पाठपुरावा करून छावण्या चालकांना बिले अदा करावीत.अशी मागणी आपण शासनदरबारी केली आहे.

बबनराव पाचपुते (आमदार,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading