दिनांक ९ जानेवारी (काष्टी,श्रीगोंदा):
तालुक्यातील काष्टीत काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी पत्रकार दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेरमन मगर म्हणाले की, काळानुसार पत्रकारिता बदलत चाललेली आहे. जुन्या राजकीय नेत्यांनी सहकारातून मुहूतरमेड रोवली, त्यातून अनेक संसार उभे राहिले. परंतु, सध्या सहकार क्षेत्र मोडीस निघत चालले आहे. लेखणीचा वापर करा, लेखणीचा वापर थांबला. तर, लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात येईल, त्यामुळे लेखणी प्रखरपणे चालू ठेवावी आणि सर्व सामान्य नागरीकांना न्याय देऊन सरकारपर्यंत पोहचावे. तसेच, सामान्यांना न्याय मिळवून द्यावा. अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी व्यक्त केली. आज कारखानदारी अडचणीत आहे. पण, तरीही या सर्व सहकारी संस्था टिकणे गरजेचे आहे. असेही त्यांनी सांगितले.
यावेळी दीपक भोसले, आण्णासाहेब शेलार, केशव मगर, वैभवदादा पाचपुते, जिजाबापू शिंदे यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकार दत्ता पाचपुते, सुभाष शिंदे, शिवाजी साळुंखे, अंकुश शिंदे, दादा सोनवने, मुसताक पठाण, राजू शेख, विजय उंडे, राजेंद्र राऊत, योगेश चंदन, प्रमोद आहेर, शकील शेख आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
कोजनचे ३५ कोटी वाचले नाहीत..
सत्ताधाऱ्यांनी जर कंडेसर घेतले असते. तर, कारखाना बंद असला तरीही कोजन चालू राहिले असते. मात्र, पार्ट कमी खरेदी केल्यामुळे कारखान्याला फार मोठा तोटा सहन करावा लागतो आहे. परिणामी ३५ कोटी वाचले नाही. तर, दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. असा आरोप माजी व्हा.चेरमन केशवभाऊ मगर यांनी केला आहे.
कामगारांचे पगार थकीत:
स्व. शिवाजीराव नारायणराव नागवडे यांनी लोकांचे संसार उभे करण्यासाठी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यातून अनेकांचे संसार उभे राहिले. मात्र, मागील ६ महिण्यांपासून कारखाना कामगारांचे पगार मिळाले नाहीत. त्यामुळे घरचेच उपाशी आहेत. तर, सर्व सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल मगर यांनी उपस्थित केला.
स्रोत:(पत्रकार परिषद)
