पेडगावात क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन..

दिनांक ९ जानेवारी(पेडगाव,श्रीगोंदा):

सहारा क्रिकेट क्लब पेडगाव व बुद्धवासी आकाश म्हस्के मित्रपरिवार आयोजित भव्य फुल स्पीच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन भारतीय संविधान संघर्ष समितीचे समन्वयक ऍड. नितीन घोडके सर, ग्रा. सदस्य प्रकाश घोडके, पत्रकार शफिक भाई हवलदार, अग्निपंखचे संचालक प्रकाश म्हस्के, सा. कार्यकर्ते संतोष शिंदे, सा. कार्यकर्ते अमीर शेख, सा. कार्यकर्ते विनोद म्हस्के यांच्या हत्से करण्यात आले. याप्रसंगी पेडगाव येथील आजी माजी खेळाडू उपस्थित होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कार्यक्रमात नितीन घोडके यांनी संचालक वि. का. सोसायटी महेंद्र म्हस्के प्रथम बक्षीस, भारतीय संविधान संघर्ष समितीचे समन्वयक दीपक म्हस्के, ग्रा. सदस्य प्रकाश घोडके व नितीन घोडके सर द्वितीय बक्षीस, रा. कॉ. पार्टी तालुका अध्यक्ष हरिदास आबा शिर्के व सा. कार्यकर्ते अमीर शेख तृतीय बक्षीस, भिमराज म्हस्के व आकाश म्हस्के मित्र परिवार चतुर्थ बक्षीस, सा. कार्यकर्ते सुभाष दिवटे मॅन ऑफ दि मॅच, ग्रा. सदस्य इरफान भाई काझी ट्रॉफी सौजन्य, पै. शकुर शेख स्टॅम्प सौजन्य, पै. इरफान पिरजादे ग्राउंड सौजन्य, अमोल घोडके बॉल सौजन्य दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.याप्रसंगी संघाच्या टी शर्ट चे अनावरण करण्यात आले.

स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी सहारा क्रिकेट क्लब व आकाश म्हस्के मित्रपरिवारांचे आभार मानण्यात आले. मान्यवरांसोबत खेळाडूंनी राष्ट्रगीत गाऊन पहिला सामना सुरू करण्यात आला.

याप्रसंगी सोयल शेख, इर्शाद काझी, सनी कांबळे, छय्या गळंगे, तहीर शेख, अकबर सय्यद, राहुल घोडके गणेश कंगणे, ऋषिकेश दिवटे, अनिकेत घोडके, गणेश शिंदे, सौरव वनशिव, शुभम म्हस्के, भारत दिवटे, गणेश म्हस्के, ओंकार घोडके, यश ओहळ आदी खेळाडू उपस्थित होते.

स्रोत:(नितीन घोडके सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading