दिनांक २५ डिसेंबर, श्रीगोंदा:
ओमायक्रॉनच्या धास्तीने पोलिस यंत्रणेने शिर्डीतून २५ भिक्षेकऱ्यांना पकडून कोपरगाव न्यायालयात हजर करत त्यांची रवानगी विसापूरच्या कारागृहात करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतांनाच तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर ओमिक्रॉनच्या नव्या संसर्गाने राज्याच्या चिंतेत भर टाकल्याने प्रशासन जागे झाले आहे.
भिक्षेकऱ्यांची वाढलेली संख्या शिर्डीच्या स्थानिकांसह भाविकांना अडचणी वाढवत आहे. ओमीक्रोनचा संसर्ग थांबवण्यासाठी शिर्डी मंदिर परिसराचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळपासून साईबाबा मंदिर परिसरातील भिक्षेकरी शोधुन दिवसभरात २५ पुरुष भिक्षेकरी व ११ स्त्रियांना पकडुन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील एकही जण करोना बाधित निघाला नाही.
अखेर २५ पुरुष भिकाऱ्यांना पोलिसांनी साई संस्थानच्या बसमधून कोपरगाव न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या अनुमतीने त्या सर्वांना श्रीगोंद्यातील विसापूरच्या खुल्या कारागृहामध्ये सोडण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)
