मांडवगण येथील निंबोडी स्म्शानभूमी च्या दुरुस्ती मागणीला यश..

दिनांक २० सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा:

मौजे मांडवगण येथील निंबोडी वाडीतील स्म्शानभूमी ची वाईट अवस्था असल्याने ग्रामस्थांना ऐनवेळी रात्री अक्षरशः वाहनांच्या प्रकाशात अंत्यविधी करावा लागत होता. तुटलेले पत्रे, फरशा फुटलेल्या, दुःखात सहभागी होणाऱ्यांना बसायची सुद्धा सोय नव्हती.

या कारणास्तव कुकडी सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक झुंबर बोरुडे साहेब यांना विचारात घेऊन ८ ऑगस्ट २०२३ रोजी सामाजिक कार्यकर्ते अमोल बोरुडे यांच्या सह सागर बोरुडे, दत्तात्रय जाधव व इतर ग्रामस्थानी ग्रामपंचायत ला निंबोडी स्म्शानभूमीच्या दुरुस्तीचा विषय ग्रामसभेत घेण्यात यावा अशी विनंती करण्यात आलती.

या मागणी नुसार ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे आणि ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र माळवदकर यांनी २२ डिसेंबर २०२३ रोजी ग्रा पं. ठराव केला आणि स्थानिक विकास निधीतून अखेर निंबोडी वाडीतील बऱ्याच वर्षा पासून राखडलेले स्म्शान भूमीचे काम आत्ता मार्गी लागले आहे.

स्त्रोत:(प्रसिध्दी पत्र)

advertisement..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading