शेडगावात झालेल्या विकास कामांची पं.स.च्या चौकशी समिती मार्फत निपक्ष तपासणी व्हावी.: वामन भदे.

दिनांक २१ नोव्हेंबर(शेडगाव,श्रीगोंदा):

शेडगाव ग्रामपंचायतीने सन २०१४ ते २०२० या कालावधीमध्ये केलेल्या कामासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर व प्रहार जनशक्ती पक्ष, श्रीगोंदा तालुका वामनभाऊ भदे (प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली प्रहार पदाधिकारी व शेडगावचे ग्रामस्थानी मिळून मागील महिन्यात शेडगाव ग्रामपंचायतीच्या कामाची चौकशी करून,संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत म्हणून अर्ज दाखल केले होते.

https://play.google.com/store/apps/details?id=nxtgen.mycity

या अर्जाची दखल घेऊन, श्रीगोंदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी शेडगाव गावातील कामाची चौकशी करून, शेडगाव ग्रामस्थांना योग्य न्याय मिळावा यासाठी चार प्रशासकीय अधिकारी ज्यात उप अभियंता जिल्हा परिषद, ल. पा. विभाग श्रीगोंदा, के.एम.जगताप (वि. अ. पंचायत समिती, श्रीगोंदा), एस.एस.भोग (वि. अ. पंचायत समिती, श्रीगोंदा), पाचनकर( कनिष्ट अभियंता) यांची नियुक्ती झालेल्या कामाची चौकशी करण्यासाठी केलेली आहे.

या नियुक्तीतून शेडगाव गावातील ग्रामस्थांना प्रहार जनशक्ती पक्ष श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाला यश येईल अशी आशा वाटत आहे. खरं तर, शेडगाव गावामध्ये गेल्या दोन वर्षांपासून साधारण दोन कोटी पेक्षा जास्त रुपयांची कामे झालेली आहेत. त्यामध्ये खडीकरणाची २२ कामे झालेली असून, या कामांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या कामांची प्रचंड दुरावस्था झालेली असून रसाळ मळा, बोबडे मळा, झेंडे वस्ती, भदे मळा, शेंडे वस्ती, गोदान नगर अशा कितीतरी रस्त्याने येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे हा सर्व पैसा पाण्यात गेला असेच म्हणावे लागेल. खरंतर निवडून गेलेले पदाधिकारी गावचे सरपंच यांनी चांगल्या पद्धतीचे काम करुन चांगल्या दर्जाचे रस्ते करुन कायमस्वरुपी टिकतील अशा पद्धतीचे कामे करणे अपेक्षीत होते. परंतू, निकृष्ठ दर्जाची कामे करुन प्रचंड प्रमाणात पैसा कमवायचे काम ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ठेकेदार व अधिकारी यांनी मिळून केलेले असल्याचा आरोप प्रहार पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शेडगाव गावातील दत्त मंदिर जवळील गटार लाईनचे काम ९ लाख रुपयांचे झालेले असून, हालक्या दर्जाचे व कमी खर्चामध्ये काम करुन, या योजनेत सुद्धा प्रचंड प्रमाणात पैसा कमवायचे काम ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ठेकेदार व अधिकारी यांनी मिळून केलेले आहे. तसेच, शेडगाव गावातील ब्लॉक बसवायचे काम, स्ट्रीट लाईटचे काम असे कितीतरी कामे हालक्या दर्जाची केल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष वामनभाऊ भदे यांचे म्हणणे आहे.

अशा पद्धतीने कामे करुन शेडगाव गावातील ग्रामस्थांना धोका देण्याचे काम पाच वर्षांमध्ये पदाधिकारी यांनी केले आहे. आता कुठेतरी चार अधिकारी यांची नियुक्ती झाल्यामुळे या सर्व प्रश्नांना वाचा फुटली आहे. शेडगाव गावातील ग्रामपंचातीच्या कामांमधील भ्रष्टाचार बाहेर निघून ज्यांनी कोणी या कामात भ्रष्टाचार केला आहे. त्या लोकांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

विशेषतः यामध्ये गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यानंतर प्रचंड प्रमाणात दाबाव वापरायचे काम प्रस्थापित राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरुन नमूद पदाधिकारी करत असून, अधिकारी मॅनेज करायचा प्रयत्न सुद्धा ठेकेदार, पदाधिकारी व अधिकारी यांचा चालु आहे. त्यामुळे या कामातील योग्य तो तपास अधिकाऱ्यांनी प्रामाणिक पणे करावा अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी करत आहोत. सदर बाबत योग्य तो निर्णय न झाल्यास मंत्री बच्चुभाऊ कडू साहेब(शालेय व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य) यांना भेटून या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याची विनंती वामनभाऊ भदे (जिल्हा उपाध्यक्ष प्रहार संघटना), (तालुकाध्यक्ष) कृष्णाभाऊ खामकर,(शहराध्यक्ष) माधवभाऊ बनसुडे,(डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष) अमोलभाऊ झेंडे, (तालुका उपाध्यक्ष) बाबासाहेब दरोडे, विजय शेंडगे, (तालुका उपाध्यक्ष), (जिल्हा संघटक) साहेबराव रासकर, (मिडीया अध्यक्ष) संतोष गायकवाड, (शाखाध्यक्ष) भागवत व्यवहारे, (ग्रा.पं. सदस्य) भाऊसाहेब गवळी, (ग्रा.पं. सदस्य) संजय भुजबळ, (ग्रा.पं.सदस्य) महेंद्र रणसिंग, (ग्रा.पं. सदस्य) झुंबरराव जांभळे पाटील, (युवा नेते( गणेभाऊ मेहेत्रे, (युवा नेते) सुरेश कोकरे तसेच तुकाराम भोपळे, राजेंद्र कोथिंबीरे, सचिन जाधव हे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ बच्चुभाऊंना भेटून या विषयामध्ये लक्ष घालण्याची मागणी करणार असल्याचे वामन भदे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

स्रोत:(वामन भाऊ भदे यांनी प्रसिध्दीस दिलेले प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading