दिनांक २७ मे २०२५, श्रीगोंदा:

म्हातारपिंपरी गावच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच तत्पर असलेले व सामाजिक कार्याची निःस्वार्थी आवड असलेले श्री. संदीप (भैय्या) सुभाष आढाव यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. आज त्यांनी गावाच्या विकासासाठी ५०,००० रुपये रोख रक्कम सामाजिक दृष्टिकोनातून प्रदान केली.

ही मदत त्यांनी कुठल्याही प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता केवळ समाजाच्या हितासाठी दिली असून, त्यांच्या या दानशूरतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या योगदानामुळे गावात आवश्यक असलेल्या विविध विकासकामांना चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

या उदात्त कार्याबद्दल समस्त ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्या वतीने संदीप (भैय्या) आढाव यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

गावाच्या सामाजिक जडणघडणीत त्यांचा सहभाग हा नेहमीच प्रेरणादायी राहिला आहे. यापुढेही त्यांनी समाजाभिमुख दृष्टिकोन ठेऊन गावाच्या विकासासाठी सक्रिय राहावे, अशी अपेक्षा ग्रामपदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

संदीप (भैय्या) यांचे कार्य हे इतर तरुणांसाठी देखील प्रेरणास्थान ठरेल, यात शंका नाही. अशा प्रकारच्या योगदानामुळेच गावाचा खरा विकास शक्य होतो, असे मत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
स्रोत:(ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया)
