म्हशीच्या तबेल्यामुळे साळवण देवी रोडच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात..

दिनांक २४ फेब्रुवारी २०२४, श्रीगोंदा:

साळवण देवी रोडच्या नागरिकांचे म्हशीच्या तबेल्यातील मलमूत्राच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. असे श्रीगोंदा नगर परिषदेला संभाजी ब्रिगेडचे पत्र गट क्रमांक १७९३ साळवण देवी रोड पासून चारशे फूट अंतरावर किरण पवार नामक व्यक्तीने म्हशीचा तबेला गेल्या सहा महिन्यापूर्वी उभारलेला आहे.

५० ते ६० म्हशीचे धुने, धाणे, शेन, मल, मूत्र लेंडी नाल्यांमध्ये राजरोजपणे सोडल्यामुळे वायु प्रदूषण, जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे तसेच परिसरामध्ये डास, माशा, चिंलटांचे प्रमाण वाढले आहे.

येथील परिसरातील नागरिक या समस्येने हैराण झाले आहेत. येथील नागरिकांनी वेळोवेळी फोन करून गोठा मालकास सांगून काही उपयोग झाला नाही. सदर गोठा मालक हा आलीशान बंगल्यामध्ये लक्ष्मी नगर परिसरात राहत आहे. येथे गोठा तयार करून परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

याविषयी श्रीगोंदा नगर परिषदेला निवेदनाद्वारे संपूर्ण माहिती दिलेली आहे. श्रीगोंदा नगर परिषदेने संबंधित गोठा मालकावर तात्काळ नदीमध्ये सांड पाणी सोडने बंद करून येथील परिसरातील नागरिकांचे आरोग्य कसे व्यवस्थित राहील यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात. अन्यथा संभाजी ब्रिगेड मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करणार असा इशारा संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नाना शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading