आढळगाव येथील जिल्हा परिषद शाळेला छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मदिनाचा विसर..! गटशिक्षण व जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रारी..

दिनांक २९ जून २०२४, श्रीगोंदा:

तालुक्यातील आढळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळेतील शिक्षकांना २६ जून या शाहू महाराजांच्या जयंतीचा विसर पडल्याचे निदर्शनास आले.

दुपारी १:०० वाजेपर्यंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नव्हते. हा प्रकार जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुख्याध्यापकांना विचारणा केली. त्याचबरोबर गटशिक्षणाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांनाही नमूद प्रकाराबाबत माहिती दिली. यानंतर दुपारी २:०० वाजण्याच्या दरम्यान शाहू महाराजांच्या प्रतिमेला औपचारिक अभिवादन करण्यात आले.

ज्यांच्या आरक्षणामुळे शिक्षण व्यवस्थेत शिक्षक आणि मुख्याध्यापक आपले कर्तव्य बजावत आहेत, त्या शाहू महाराजांचा विसर पडणे ही मोठी खेदाची बाब असल्याचे अनेकांनी नमूद केले. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांना या प्रकरणी नोटीस काढण्यात यावी, असा आग्रह काहींनी धरला आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading