दिनांक २९ जुन २०२४, श्रीगोंदा
मुंबई येथे दिनांक २५ जून २०२४ रोजी भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी येथे कॉम.गणवीर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत कॉम. संजय डमाळ यांचे रिक्त पद भरण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक ग्रामपंचायतचे श्री बाळासाहेब आल्हाट यांची राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून एकमताने निवड झाली.
यावेळी अहमदनगर जिल्ह्याला एकूण ३ पदाधिकारी महासंघ आयटकला नियुक्त करण्यात आले. या निवडीचे संघाचे सेक्रेटरी कॉम. नामदेव राव चव्हाण, अध्यक्ष तानाजी ठोंबरे, सखाराम दुर्गुडे, गोविंद महात्रे, पांचाळ, ॲड. राहुल जाधव, मंगेश महात्रे, वसंत वाघ, नीलकंठ डोखे, ॲड. कॉम. सुभाष लांडे, ॲड. बन्सी सातपुते, कॉम. सुरेश पानसरे यांनी अभिनंदन केले आहे.
ही निवड पुढील अधिवेशन होईपर्यंत असेल, अशी माहिती संघाचे राज्य उपाध्यक्ष ॲड.कॉम.सुधीर टोकेकर यांनी दिली.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)




