दिनांक ३ ऑगस्ट,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना संक्रमण झालेल्या रुग्णांचा वाढता आलेख समोर आला असून, त्या प्रमाणात रोगातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे.
काही व्यापारी व आजपर्यंत घरात लॉक डाऊनच्या निमित्ताने भिऊन बसलेले जनतासेवक व पुढारी यांच्या आग्रहास्तव केलेला ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान तीन दिवसांचा बंद, सर्वसामान्य श्रीगोंदा वाशियांच्या उपजीविकेवर घाला घालणारा असल्याचे मत अनेकांनी सामाजिक माध्यमांतून नमूद केले आहे.
मोदी सरकारने लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर सामान्य देश वाशियांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून, त्यांना मोफत रेशन देण्याचे ठरवले. त्यानुसार पहिल्या दोन महिन्यांमध्ये धान्य, डाळी देण्यात आल्या. त्यानंतर तिसऱ्या महिन्यात मात्र, अनुदानातील धान्य सामान्यांच्या झोळीत पडले नसतानाच, तात्काळ बैठक घेत स्थानिक प्रशासनाचे मुख्य तहसीलदार यांनी लॉकडाऊन जाहीर केल्याने, सर्व सामान्यांचे तीन दिवस बरेच हाल होणार असल्याची चर्चा सामाजिक माध्यमातून गाजत आहे.
सदर बंद घोषित करण्यापूर्वी नमूद लोकांचे जसे म्हणणे ऐकून घेतले. तसेच, किरकोळ भाजी विक्रेते, छोटे किराणा दुकानदार, टपरी चालक, फळे विक्रेते, छोटे-छोटे व्यापारी व हातांवर पोट असणारे समाजातील घटक(गवंडी, बिगारी, सेंट्रिग, कामगार वगैरे) यांना मात्र विचारात घेतल्याचे दिसले नाही.
त्यामुळे तीन दिवसांचा हा लॉक डाऊन सामान्यांच्या उरावर लादला असल्याचे अनेकांचे मत आहे. भले तीन दिवसांत कोरोना तर पूर्ण बरा होणार नाही किंवा दूरगामी परिणाम होईल असा निकाल यातून निघणार नाही. तरीही, तात्काळ लॉक डाऊनचा निर्णय सामान्यांच्यासाठी जास्तीत डोस झाल्याचे समजते आहे.
मागील महिन्यामध्ये कोरोनाने थैमान घातले असतांना शहरासह तालुक्यात होणारी गर्दी उच्चांकी होत होती. तरी, स्थानिक प्रशासनाने कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केल्याचे समोर आलेले नाही.
त्यात तीन दिवसांचा हा बंद कोरोना प्रादुर्भावावर थेट परिणाम करणारा नसला. तरी सामान्यांच्या उपजीविकेवर मात्र परिणाम करणार असल्याचे, यातून समोर येत आहे.
स्त्रोत: (सामाजिक माध्यमात चालू असलेली चर्चा व मिळालेली माहिती)
