लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०० वी जयंती उत्सवात साजरी..

दिनांक ३ ऑगस्ट,पेडगाव/श्रीगोंदा:

येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे नगर मध्ये जागतिक महामारी कोरोनामूळे भौतिक अंतर पाळून अण्णाभाऊंची १०० वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लुहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन करून महामानवांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात आयकॉन्स फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष नितीन घोडके यांनी अण्णाभाऊंच्या कार्याची दखल म्हणून, भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा, अशी भावना व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्ते दीपक म्हस्के, ग्रा. सदस्य प्रकाश घोडके, राहुल घोलप यांनी आपल्या मनोगतात आण्णाभाऊंच्या कार्याचा आढावा घेतला. फटाके फोडून आनंदउत्सव साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष प्रमोद दिवटे, संतोष शिंदे, प्रकाश म्हस्के, दीपक दिवटे, सुरज दिवटे, सचिन दिवटे , महेंद्र दिवटे, दत्ता दिवटे, किशोर दिवटे , सुभाष दिवटे , सौरव दिवटे, राहुल घोलप, दत्ता घोलप,भरत दिवटे, विकास दिवटे, राजेंद्र दिवटे, धोंडू दिवटे, मंगेश दिवटे, सुधीर दिवटे ,दादा दिवटे , देविदास दिवटे, विशाल वाघमारे, श्रावण चव्हाण, सागर दिवटे, हर्षद दिवटे, अतुल दिवटे, काळू कुचेकर, भाऊसाहेब शिरवळे, अक्षय जाधव, संदीप दिवटे, प्रवीण दिवटे, रुपेश दिवटे, साहेबराव दिवटे, सुधीर दिवटे, कैलास दिवटे, रोहन दिवटे, कैलास दिवटे, अमोल दिवटे, अनाजी दिवटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

स्रोत: (नितीन घोडके, सर यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading