दिनांक ३ सप्टेंबर २०२४, श्रीगोंदा लोणी काळभोर:

रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गणेशवाडी एच.पी. पेट्रोल पंपाजवळ एक भीषण अपघात घडला. एमआयटी शौक्षणिक संकुलात चुलत भावाच्या प्रवेशासाठी निघालेल्या कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला भरधाव वेगात असलेल्या डंपरने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर निरीक्षक अधिकारी अभिजीत पवार (वय ३६) आणि त्यांच्या वडिलांचा सुरेश पवार (वय ६२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अभिजीत पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी वाघोली येथून लोणी काळभोर येथील एमआयटी शौक्षणिक संकुलात चुलत भावाच्या प्रवेशासाठी प्रवास सुरु केला होता. थेऊर हद्दीतून लोणी काळभोरकडे जात असताना, त्यांच्या चारचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात अभिजीत पवार आणि त्यांचे वडील गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात डंपरचालक संदेश लक्ष्मणराव पवार (वय ३३, रा. वाघोली, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिजीत पवार यांचे चुलत बंधू अनिकेत सुरेश पवार (रा. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)







