शेडगाव येथील विनापरवाना खते व किटकनाशक साठा जप्त.तर, संबधीत विक्रेत्यावर कृषी विभागाकडून गुन्हा दाखल.

दिनांक ७ सप्टेंबर(शेडगाव,श्रीगोंदा):

येथे विनापरवाना खते साठवणूक करणे व विक्री करणे या विरोधात सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्राचे चालक विजय रघुनाथ पवार, रा. जलालपुर ता. कर्जत यांच्या विरोधात कृषी विभागाद्वारे दिनांक ५ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार खत नियंत्रण कायदा, किटकनाशक कायदा व अत्यावश्यक वस्तू कायदा अतंर्गत तरतुदीचा भंग केल्यामुळे सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधीत कृषी सेवा केंद्र हे कोणत्याही परवान्या शिवाय कार्यरत होते. सदरील कृषी सेवा केंद्राची तपासणी, पंचनामा सील करण्याची कारवाई पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी व डॉ. राम जगताप यांच्यासह, अमजद ताम्बोळी, किसन सांगळे व संदीप बोदगे यांच्या भरारी पथकाने केली. कारवाई दरम्यान रु. ३.२९ लक्ष रक्कमेची खते तर रु. १.२६ लक्ष रक्कमेची किटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.

याबाबतीत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे संबधीत विक्रेत्यावीरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन, या पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सतीश गावित हे करत आहेत.

खत, बियाणे व किटकनाशके विक्रेत्यांनी या कायद्याचे सक्तीने पालन करावे, कायद्याचे उल्लंघन केल्यास, कृषी विभागाकडून फौजदारी कारवाई केली जाईल. असा इशारा पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी यांनी दिला आहे..

स्रोत:(शफीक हवलदार,पेडगाव व अनिल दळवी, शेडगाव यांनी दिलेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading