नगरपालिके मार्फत चालू रस्त्याच्या कामात, मातीमिश्रित डस्टचा वापर. पूर्वीप्रमाणेच रस्त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होणार ?

दिनांक १० मे श्रीगोंदा:

श्रीगोंदा शहरांमध्ये शिवाजी चौक ते दिल्ली दरवाजा वेस दरम्यान रस्ता कॉंक्रिटीकरनाचे काम नगरपालिका प्रशासनामार्फत चालू करण्यात आले आहे. कोरोणा साथीमुळे प्रशासकीय यंत्रणा प्रभावित झाली असतांना, मोजक्या लोकांच्या माध्यमातून काम राबविण्यात येत असल्याचे पालिका पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. लोकं आपल्या घरामध्ये आहेत,रस्त्यांवर गर्दी नसल्याने पालिकेने लॉकडाऊन काळात मजूर, ठेकेदार, इंजिनिअर व इतर मशीन ऑपरेटर यांच्यात सामाजिक अंतर राखत,काम जरी चालू केले असले, तरी नमूद कामावर मात्र,निराळी परिस्थिती आहे.

काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या या कामांमध्ये वापरण्यात येणारी डस्ट पूर्णपणे मातीमिश्रित असल्याचे निदर्शनात येत आहे. शासनाच्या धोरणामध्ये नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून, डस्टचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र,शासकीय निकषांनुसार नमूद काम करण्यात येत नसून, आवश्यकते नुसार कॉंक्रिटीकरणाचे काम चालू आहे.अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे रस्ता खोदून त्या ठिकाणी माती, मुरुम, खडी वापरण्यात येत नसल्याचेही दिसून येत आहे.

अनेक वेळा शिवाजी चौक ते दिल्ली दरवाजा वेस दरम्यान रस्त्याचे काम करण्यात आले असून, निकृष्ठ दर्जाचे मटेरियल वापरल्याने वारंवार नगरपालिकेला या रस्त्याचे काम करण्याची वेळ आली आहे. तसेच, आपल्या वतीच्या ठेकेदारांना कामे देऊन, कामाची गुणवत्ता ढासळत आहे. रस्त्याच्या दर्जा आणि गुणवत्तेवर यापूर्वीही परिणाम झालेला असून, यापुढेही नक्कीच परिणाम होणार असल्याचे समोर येत आहे.

याप्रकरणी नमूद कामावरील ठेकेदार व नगरपालिका प्रशासनाचे इंजिनियर यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading