श्रीगोंदयातील ३०४ परप्रांतीय मजुरांना,त्यांच्या गावी जाण्यासाठी बसची व्यवस्था..

दिनांक १० मे,श्रीगोंदा:

तालुक्यात अडकलेल्या ३०४ परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी श्रीगोंदा बसस्थानकातून सकाळी १०.१५ वाजता १४ एस.टी. बसेसमधून अहमदनगर रेल्वे स्थानकापर्यंत पुढील रेल्वे प्रवासासाठी पाठविण्यात आले.

यावेळी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे व सोशल डिस्टंशिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. सर्व परप्रांतीय मजूरांना जेवणाची फूड पँकेटस व पाणी बाँटल देण्यात आली. यावेळी परप्रांतीय मजूरांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान पाहण्यास मिळाला.

याठिकाणी श्रीगोंदा तहसिलदार श्री. महेंद्र माळी, श्रीगोंदा आगार व्यवस्थापक श्री. प्रविण शिंदे, वाहतूक निरीक्षक श्री. रोहित रोकडे तसेच महसूल व परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच एस टी बस चालक नियोजनासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading