बाबुराव बोत्रेपाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम; रक्तदान शिबीर व शालेय साहित्याचे वाटप

श्रीगोंदा:
ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीगोंदा तालुक्यात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचा बडेजाव टाळून सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यात रक्तदान शिबीर, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
या वाढदिवसानिमित्त हिरडगाव येथील ‘गौरी शुगर’ कारखान्यावर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याशिवाय, तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट देण्यात आली.
वस्तीगृहातील मुलांना साखर व साहित्याचे वाटप
घुगल वडगाव येथील महामानव बाबा आमटे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना गौरी शुगरच्या संचालिका सुरेखा बोत्रेपाटील, गौरी बोत्रेपाटील आणि कारखान्याचे व्यवस्थापक रोहीदास यादव यांच्या हस्ते साखर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मान्यवरांनी बाबुराव बोत्रेपाटील यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच ढवळगाव येथेही एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेल्या या समाजोपयोगी उपक्रमांमुळे बोत्रेपाटील यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading