दिनांक ९ मे २०२४, श्रीगोंदा:
दिनांक १ मे २०२४ रोजी श्रीगोंदा पंचायत समिती बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता श्री पाचनकर पी. एन. यांनी त्यांच्या मोबाईल वरून, स्टेटसद्वारे लोकसभेच्या उमेदवारांचा लग्नात हजेरी लावलेली छायाचित्रं सामाजिक माध्यमांद्वारे प्रसिद्धी केलेली आहेत.
याबाबत निलेश गोरे यांनी तक्रार केली आहे. शासकीय नोकरदारास, निवडणुकीत राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धी करणे, राजकीय पत्रक वाटणे, जाहीरपणे भाषणे करणे, प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणे आदीसारख्या बाबींवर भारतीय निवडणूक आयोगाने आचार संहितेचे निर्बंध घातलेले आहेत. तरीही काही खास राजकीय पदाधिकाऱ्यांचे मर्जीतील अधिकारी आपल्या शासकीय नोकरीचा विचार न करता बिनधास्तपणे प्रचारात व्यस्त आहेत. अशी दिसून येत आहे.
याबाबत श्री निलेश गोरे, राहणार मढेवडगाव यांनी नमुद गोष्टीवर निर्बंध असावे म्हणून, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ३७ अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ तसेच १०० मिनिटात कारवाई या ॲपवर दिनांक १ मे २०२४ रोजी तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीच्या नोडल अधिकारी श्रीमती फराटे मॅडम, श्री पाचनकर व तक्रारीचा अहवाल देणारे अधिकारी श्री भोसले उप अभियंता हे तिन्ही अधिकारी एकाच कार्यालयात काम करत आहेत. त्यामुळे कसलीही चौकशी न करता.. आदर्श आचार संहिताचे नियमावली न पाहता.. ना कोणता संदर्भ घेता.. तक्रारीचे अवलोकन न करता अति. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी तक्रार निकाली काढन्याची घाई केली असल्याचे तक्रारदार श्री निलेश गोरे यांचे म्हणणे आहे.
या निकाली प्रकरणावर त्यांनी जिल्हा आचारसंहिता कक्ष प्रमुख यांना संपर्क करून सदर तक्रारीबाबत विचारणा केली असता, तुम्ही निश्चिंत राहा.. मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना तात्काळ फेर चौकशी करून कारवाई करण्यासाठी सांगतो. असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणावर हरकत असून, फेर चौकशी करण्यात यावी.. असे निलेश गोरे यांनी म्हटले आहे.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र व तक्रार)
