जवानांची विरगाथा..(अंबादास पवार.शहीद दिनांक २६ नोव्हेंबर २००८,घारगाव तालुका श्रीगोंदा)..

अंबादास पवार

अंबादास रामचंद्र पवार याचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील शिरूरकवठे पाडेगाव येथील आश्रमशाळेत राहुन नववी केली आणि गावातील महाविद्यालयात बारावी पर्यंत शिक्षण घेतले . लहानपणापासून पोलिस होण्याची इच्छा असलेला अंबादास दि .१८ / ६ / २००५ रोजी मुंबई पोलिस दलात दाखल झाला दि २६/११/२००८ रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील फ्लाट क्रमांक सात पोलिस मित्रांची रायफल घेऊन अतिरेक्यांवर निशाणा साधला.पण, अतिरेक्याच्या गोळीने अंबादास पवार चा वेध घेतला आणि अंबादास पवार देशासाठी धारातिर्थी पडला .

अंबादास पवार यांचा जन्म दि २३ / १ / १९८१ रोजी रामचंद्र व कमलबाई यांच्या पोटी झाला. सुनील व दत्तात्रय हे भाऊ गरीबीच्या वेदना लहानपणापासून सोसण्याची वेळ त्यामुळे शिक्षणाचा श्रीगणेशा आश्रमशाळेत झाला. शाळेत असताना खेळ,डान्स, मनोरंजन आणि मित्र जमविण्याची विषेश आवड ज्युनिअर कॉलेजला असताना सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन शिरूरकवठे चा कलामंच गाजविला .

बारावीत असताना हा शिरूरकवठेचा भुमीपुत्र मुंबई पोलिस मध्ये कॉस्टेबल म्हणून दाखल झाला. दि. २७/५/२००५ रोजी निरा येथील शिवाजी देशमुख यांची कन्या कल्पना यांच्याशी विवाह झाला आणि वैवाहिक जीवन सुरू झाले. पत्नी गावीच होत्या. अंबादास पवार यांनी लहानभाऊ सुनीलचा विवाह जमविला डिंसेबर २००८ मध्ये विवाहाची तारीख धरली. आपल्या भावाच्या लग्नासाठी अंबादास ने बस्ता खरेदी केला. सुट्टी टाळून गावी जाण्याचा विचार होता. त्याने पत्नी कल्पना यांना फोनवर तसे सांगितले होते . कल्पना या गावी असल्या तरी दररोज यांचा अंबादास यांचा संवाद होत होता . सुखी संसारात विवेकच्या रुपाने एक पुष्प उमलले होते. विवेक नऊ महिन्याचा झाला होता. विवेकला पैलवान करायचे तर मुक्त विद्यापीठात बी . ए . करून फौजदार होणार आहे. अशी ध्येय डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील धावत्या युगात अंबादास एक दक्ष पोलिस काम करीत होता .

दि २६ नोव्हेंबर २००८ दिवस अंबादास छत्रपती शिवाजी टर्मिनस कडे लोकलने जात होता. कल्पना यांचा लोकलमध्ये फोन चालू होता . छत्रपती शिवाजी टर्मिनल जवळ आले होते. तेवढ्यात अंबादास कल्पनाला म्हणाले कि कल्पना स्टेशनवर फटाक्यांचा आवाज येतोय मी फोन बंद करतो . अंबादास लोकलमधून खाली उतरला. तर, बेधुंद गोळीबार चालू होता. एका पोलिस मित्राची एके ४७ रायफल लॉक झाली. ही एके ४७ रायफलने अंबादासने घेतली आणि लॉक काढले आणि अंबादासने अतिरेक्यांना लक्ष केले. अंबादास आपला खत्मा करणार हे अतिरेक्याच्या लक्षात आले. त्यांनी अंबादासला लक्ष केले अंबादास रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि शिरुर कवडेचा वीरपुत्र अंबादास यांची शौर्य गाथा मावळली.

शासनाने या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना मोठी मदत केली. मध्ये शहीद अंबादास यांच्या पत्नी कल्पना यांना श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे पेट्रोल पंप दिला. त्यामुळे अंबादास पवार हे सातारा जिल्हातील असले तरी त्यांच्या कुंटुबांचे श्रीगोंदा तालुक्याच्या सैनीकी मातीशी नाते निर्माण झाले आहे.

विवेक हा लहान असताना वडील अंबादास शहीद झाले. त्याच्यामुळे वडील आठवत नाही. पण शाळेत लहानपणी आईला विवेक म्हणायचा सारी मुल पालक मिटींगला पप्पांना घेऊन येतात. माझे पप्पा माझ्या बरोबर कधी येतील सांगना गं ! आई . यावर दाटलेले अश्रूसोडून मला काही काहीच आठवत नव्हते . कल्पना अंबादास पवार (वीरपत्नी)

शब्दांकन : चंदन घोडके, बहुजन पत्रकार
स्त्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading