जवानांची विरगाथा..(कपिल गुंड..शहीद दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ अजनुज तालुका श्रीगोंदा)..

कपिल गुंड

भीमा नदी काठावरील ऊसाचे भांडार असलेले अजनुज हे गाव ! घरची परिस्थिती जेमतेम कपिल नामदेव गुंड यांना शालेय जीवनापासून भारतीय सैन्य दलाचा लढाऊ बाणा आणि वर्दीचे आकर्षण, कपील दि . २८ जानेवारी २०१३ रोजी भोपाळ येथे झालेल्या जवान भरतीत भारतीय सैन्य दलात जम्मु काश्मीर मध्ये उरी येथील सैनीक छावणीत कुक कमांडर म्हणून भुमिका बजावत असताना, रॉकेल भट्टीचा स्फोट घेऊन १५ नोव्हेंबर २०१८ रोजी कपीलला वीर मरण आले. अजनुजकरांचा दुसरा भुमीपुत्र देशासाठी कामी आला .

कपील चे वडील नामदेव गुंड हे रिटायर फौजी, आई पुष्पाताई त्यांना सचीन व कपील ही दोन मुल झाली. सचीन कपिल हे सर्व खेळात तरबेज धिप्पाड शरीरयष्टी असलेले तरुण मुल सचीन हा ठाणे पोलिस मध्ये भरती झाला.

कपिलने माध्यमिक शिक्षण अजनुज येथील वळणेश्वर विद्यालयात तर बारावी पर्यंतचे शिक्षण श्रीगोंदा येथील महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात घेतले. कपील हा एन सी सी मधील मुलांची कवायत करून घेत असे. त्याला महाविद्यालयात कपिल कमांडर अशी टोपण नावाने ओळख झाली .

बारावी शिक्षण सोडून कपील गुंड दि २८ जानेवारी २०१३ मध्ये भारतीय सैन्य दलातील ए एम ई बटालियन मध्ये भरती झाला आणि भारतीय सैन्य दलातील जीवन प्रवास सुरू झाला .

दि. १३ जानेवारी २०१५ रोजी कोंभळी येथील बाळासाहेब गांगर्डे यांची कन्या माधुरी हीच्या बरोबर कपील विवाहबद्ध झाला. अनुष्का आणि अविस्कार ही दोन मुल झाली.सुट्टीला घरी आला कि आई व पत्नीला आपल्या बरोबर काश्मीरला घेऊन जाण्याचे नियोजन आखले होते. दि. १५ नोव्हेंबर २०१८ रोजी तापमानचा पारा ० डिग्री सेल्सिअसच्या खाली गेला होता. थंडीत हातांना कशाची जाणीव होत नव्हती. एवढी जीव घेणी थंडी सकाळची वेळ कपील गुंड आपल्या सहकाऱ्यांना भोजन तयार करत होता. रॉकेल भट्टीचा स्फोट झाला. आपला सहकारी रुपेनला मदतीला कपिल धावला. पण, कपील शंभर टक्के भाजला यामध्ये कपीलला वीररमण आले आहे .

या दुदैवी घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि अजनुज गाव सुन्न झाले. महिलांनी अंत्ययात्रा मार्गावर सडा टाकून रांगोळ्या काढल्या.नदीच्या काठावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले. या वीरभूमीपुत्राला शेवटचा सलाम केला.

आई तुला कामामुळे कुठ फिरता आले नाही. मी आता जम्मू काश्मीर आहे. तुला विमानात बसून वैष्णव देवीच्या दर्शनासाठी जाऊ म्हणाला होता. पण माझा बाबा परत आला नाहीच. याची आठवण आयुष्यभरासाठी आहे. पुष्पाबाई गुंड वीरमाता

जिद्दीला सलाम देशासाठी मला काहीतरी करून दाखवायचे आहे तुम्हाला जे जमल नाही मी ते करून दाखवणार आहे खुप जिद्दी स्वभाव होता कपीलच्या अनेक आठवणी अंतःकरणात घर करून राहील्या आहेत. नामदेव गुंड कपीलचे वडील

शब्दांकन: अंकुश तुपे,श्रीगोंदा
स्रोत:(अग्निपंख फौंडेशन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading