दिनांक ३ जून २०२५ , श्रीगोंदा/पुणे:

बालेवाडी, पुणे – आज दिनांक ३ जून २०२५ रोजी बालेवाडी येथील एका भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी ग्रामपंचायतीच्या गृहसंकुलास राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला. या विशेष प्रसंगी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री भरत गोगावले तसेच राज्य मंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या गौरवाचा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गट विकास अधिकारी राणीताई फराटे यांनी स्वीकारला. त्यांच्यासोबत विस्तार अधिकारी मोहसीन मालजप्ते, ग्रामसेवक लक्ष्मण मुरकुटे आणि इतर ग्रामसेवक यांचीही उपस्थिती होती.

वांगदरी ग्रामपंचायतीने ग्रामीण भागातील गरजूंना निवासाची सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक सोयींनी युक्त घरे प्रदान करून या योजनेत आपला ठसा उमटवला आहे. संकुलातील घरांची गुणवत्ता, नियोजन, आणि वेळेत पूर्णत्व या सर्व निकषांवर वांगदरीने इतरांपेक्षा उजवे ठरून हा सन्मान पटकावला.

कार्यक्रमादरम्यान मंत्रीमहोदयांनी ग्रामीण भागात होत असलेली प्रगती, योजनांची अंमलबजावणी आणि स्थानिक प्रशासनाच्या सक्रिय सहभागाबाबत समाधान व्यक्त केले.

स्रोत:(अधिकृत माहिती)
