श्रीगोंदा नगरपरिषदेची नवी प्रभागरचना जाहीर – ९ ऐवजी ११ प्रभाग, नगरसेवक २२; हरकतींसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत..

श्रीगोंदा | दि. १८ ऑगस्ट २०२५:

श्रीगोंदा नगरपरिषदेची निवडणूक काही दिवसांत पार पडणार असून, नगरसेवक होण्याच्या दृष्टीने अनेकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र आज जाहीर झालेल्या नव्या प्रभागरचनेमुळे अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बदलले वातावरण पाहायला मिळत आहे.

९ वरून ११ प्रभाग – नगरसेवकांची संख्या २२

आधी श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रात ९ प्रभाग व १९ नगरसेवक होते. नव्या रचनेनुसार आता ११ प्रभाग व २२ नगरसेवक असणार आहेत. यावर्षी राखीव जागांची संख्या एकाने वाढून ती ३ होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

प्रभागनिहाय लोकसंख्या व सीमांकन

👉 प्रभाग क्र. १ : लोकसंख्या २७६८
सीमा – उत्तर: घोटवी शिव ते वडळी रोड, पूर्व: घोटवी शिव ते वडळी रस्ता-शनि चौक, दक्षिण: शनि चौक-नायरा पेट्रोल पंप, पश्चिम: नायरा पंप-देवी मंदिर-दत्तवाडी-घोटवी शिव.

👉 प्रभाग क्र. २ : लोकसंख्या २८८४
सीमा – उत्तर: वडळी शिव–बेलवंडी कोठार रस्ता, पूर्व: मांडवगण रस्ता–बोरुडे शॉपिंग सेंटर–शेळके घर, दक्षिण: इंगळे घर-जोधपूर मारुती-शनि चौक, पश्चिम: शनि चौक-वडळी रस्ता-वडळी शिव.

👉 प्रभाग क्र. ३ : लोकसंख्या २६७३
सीमा – उत्तर: मांडवगण रोड-घुगलवडगाव शिव, पूर्व: आढळगाव शीवे-बाजारतळ, दक्षिण: बाजारतळ-दत्त मेडिकल, पश्चिम: दत्त मेडिकल-कुरेश नगर-जय मल्हार मटन-झेंडा चौक-बगाडे डॉक्टर-आमले घर-रोहिदास चौक- दिल्ली वेस-घुगलवडगाव शिव.

👉 प्रभाग क्र. ४ : लोकसंख्या ३०३२
सीमा – उत्तर: आंबेडकर चौक-आढळगाव रोड, पूर्व: आढळगाव शीव-घोडेगाव रोड, दक्षिण: घोडेगाव रोड-ससाणेनगर-जामखेड रस्ता-लेंडी नाला, पश्चिम: जामखेड रस्ता-लेंडी नाला-आंबेडकर चौक.

👉 प्रभाग क्र. ५ : लोकसंख्या २६५०
सीमा – उत्तर: बगाडे डॉक्टर-आमले घर-जुनी सेंट्रल बँक-रोकडोबा चौक-काळकाई चौक, पूर्व: दत्त मेडिकल-कुरेश नगर-जय मल्हार मटन-बाजारतळ-झेंडा चौक-बगाडे डॉक्टर, दक्षिण: दौंड-जामखेड रस्ता-आनंदकर हॉस्पिटल-दत्त मेडिकल, पश्चिम: काळकाई चौक-दौंड-जामखेड रस्ता-आनंदकर हॉस्पिटल.

👉 प्रभाग क्र. ६ : लोकसंख्या २९९१
सीमा – उत्तर: सुतार गल्ली-जिल्हा परिषदेची शाळा-संत गोरोबा गल्ली-भापकर हॉस्पिटल, पूर्व: जुनी सेंट्रल बँक-रोहिदास चौक-सुतार गल्ली, दक्षिण: काळकाई चौक-जुनी सेंट्रल बँक, पश्चिम: भापकर हॉस्पिटल-शिंपी गल्ली-नगरपरिषद मागील बाजू-काळकाई चौक.

👉 प्रभाग क्र. ७ : लोकसंख्या ३०८३
सीमा – उत्तर: शनि चौक-इंगळे घर-शेळके घर-बोरुडे शॉपिंग सेंटर, पूर्व: बोरुडे शॉपिंग सेंटर-दिल्ली वेस, दक्षिण: दिल्ली वेस-जिल्हा परिषदेची शाळा-संत गोरोबा गल्ली-भापकर हॉस्पिटल-बायपास रोड सूर्यनारायण मंदिर, पश्चिम: बायपास रोड सूर्यनारायण मंदिर-शिवाजी चौक गार्डन-शनि चौक.

👉 प्रभाग क्र. ८ : लोकसंख्या २९१०
सीमा – उत्तर: बाबूर्डी शिव-पारगाव शिव-घोटवी शिव, पूर्व: पारगाव रोड-दत्तकृपा कंपनी-बाबूर्डी फाटा-देवी मंदिर-दत्तवाडी-घोटवी शिव, दक्षिण: पारगाव रोड-दत्तकृपा कंपनी-बाबूर्डी फाटा, पश्चिम: पारगाव रोड-दत्तकृपा कंपनी-बाबूर्डी रोड-बाबूर्डी शिव.

👉 प्रभाग क्र. ९ : लोकसंख्या २६९२
सीमा – उत्तर: पारगाव रोड-दत्तकृपा कंपनी-बाबूर्डी रोड-बाबूर्डी शिव, पूर्व: पारगाव रोड-दत्तकृपा कंपनी-शिवाजी चौक-बायपास रोड-सूर्यनारायण मंदिर-उभी पेठ-शिंपी गल्ली-नगरपरिषद मागील बाजू-काळकाई चौक-दौंड-जामखेड रस्ता-आनंदकर हॉस्पिटल-महात्मा फुले चौक, दक्षिण: महात्मा फुले चौक-काष्टी रोड-पाण्याचा चारी-स्टेशन रोड, पश्चिम: स्टेशन रोड-म्हातारी पिंप्री-बाबूर्डी शिव.

👉 प्रभाग क्र. १० : लोकसंख्या २७४८
सीमा – उत्तर: महात्मा फुले चौक-काष्टी रोड-पाण्याचा चारी-स्टेशन रोड, पूर्व: महात्मा फुले चौक-पेडगाव रोड-चोराची वाडी शिव, दक्षिण: चोराची वाडी शिव-काष्टी रोड-लिपणगाव शिव, पश्चिम: काष्टी रोड लिपणगाव शिव-स्टेशन रोड शिव.

👉 प्रभाग क्र. ११ : लोकसंख्या २७०३
सीमा – उत्तर: घोडेगाव रोड-मिशन बंगला-ससाणे नगर-जामखेड रस्ता-महात्मा फुले चौक-पेडगाव रोड, पूर्व: भिंगन शिव-नगरपरिषद हद्द-घोडेगाव रोड, दक्षिण: चोराची वाडी शिव-भिंगन शिव, पश्चिम: महात्मा फुले चौक-पेडगाव रोड-चोराची वाडी शिव.

हरकतींसाठी मुदत

सदर प्रभागरचनेवर नागरिकांना हरकती नोंदवण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत दिली आहे. त्यानंतर अंतिम प्रभागरचना जाहीर होणार आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Check out this shop on Meesho – https://www.meesho.com/PATELBROTHERSSHOP?_ms=3.0.3

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading