श्रीगोंदा नगरपालिकेकडून मानवाधिकारांचे उल्लंघन होत असतांना.. मानवी मूल्यांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी गप्प असणे निषेधार्य..!

दिनांक ३ जानेवारी, श्रीगोंदा:

वेगवेगळ्या वित्त आयोगांच्या माध्यमांतून विकास कामे करणारी श्रीगोंदा नगरपालिका सामान्य कर्मचाऱ्यांचा वापर करून, त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन तर करत नाही ना..? असा सवाल आता येथे उपस्थित होत आहे.

काही दिवसांपूर्वी श्रीगोंद्यातील जोधपूर मारुती चौक येथील मुख्य रस्त्यावर लिकेज झालेला चेंबर दुरूस्त करण्यासाठी स्वच्छता विभागाच्या ठेकेदाराने एका आदिवासी समाजाच्या मुलाला या घाणीत विना सुरक्षा उपकरणांचे उतरवले होते. ही बाब माध्यमांच्या लक्षात आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

आदिवासी समाजाच्या एका तरुणाला घाण पाण्याने भरलेल्या नालीमध्ये उतरवण्यात आले. सुरक्षेचे कोणतेही उपकरण न लावता त्याला हे काम करण्यास लावल्याचे दिसले. कोरोना महामारी सह ओमीक्रोनच्या वाढत्या गंभीर साथीमध्ये विना सुरक्षा किटसह आदिवासी समाजाच्या तरुणांचे मानवी मूल्यांचे हनन आणि मानवाधिकाराचे उल्लंघन होईल अशी कामं श्रीगोंदा नगरपालिकेच्या कंत्राटी ठेकेदारांकडून करून घेतली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. While human rights are being violated by Shrigonda Municipality .. Social activists working for human values, office bearers should be silent ..!

मात्र, याहुन ही अमानवीय म्हणजे, असेकाही वारंवार कार्यक्षेत्रात होत असतानाही, याबाबत कोणताही सामाजिक कार्यकर्ता, मानवी मूल्यांबाबत काम करणारा पदाधिकारी किंवा माणसाप्रति सकारात्मक दृष्टिकोन असलेला एखादा राजकीय नेता बोलत नाही.. हे मात्र दुर्भाग्य आहे .

त्यामुळे अशा कृत्यांच्या निषेधार्थ शहर, तालुक्यासह जिल्ह्यातील सामाजिक पदाधिकाऱ्यांनी किंवा मानवाधिकारांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आवाज उठवणे गरजेचे झाले आहे. त्याशिवाय श्रीगोंदा नपामार्फत सर्रास करण्यात येणारी नमूद काम थांबवली जाणार नाहीत.

स्रोत:(अधिकृत माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading