अरुणाताईंच्या निधनाने नाभिक समाज पोरका झाला: पै.अजय रंधवे.

दिनांक २७ एप्रिल, श्रीगोंदा:


महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते मा. श्री. कल्याणरावजी दळे साहेब यांच्या सुविद्य पत्नी अरुणाताई दळे यांच्या निधनाने नाभिक समाज हा पोरका झाला असून, नाभिक समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. असे मत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतांना महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सोशल मिडिया राज्य प्रसिद्धी प्रमुख पै. अजय रंधवे यांनी व्यक्त केले आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

गेल्या अनेक वर्षांपासून कल्याणराव दळे समाजासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या पत्नी अरुणाताई दळे ह्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजकार्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होत्या. परंतु, शुक्रवार दि.२३ एप्रिल रोजी त्यांच्यावर काळाने झडप घातली असून, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे नाभिक समाजाची नव्हे तर बारा बलुतेदार महासंघाची एक मोठी हानी झाली आहे. (With the demise of Arunatai, the nuclear community became an orphan: Pa. Ajay Randhave.) एक शांत, संयमी स्वभावाच्या अरूणाताई आपल्यातून निघून गेल्या असून, या गोष्टीवर तर माझा विश्वासच बसत नाही. असे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे सोशल मिडिया राज्य प्रसिद्धी प्रमुख पै. अजय रंधवे यांनी शोक व्यक्त केला.

स्रोत:(अजय रंधवे,पदाधिकारी नाभिक समाज,श्रीगोंदा.)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading