दिनांक २४ जून,अहमदनगर:
ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या आदेशाने, विनोद भोळे( महाराष्ट्र महासचिव) यांनी योगेश थोरात यांची अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
ऑल इंडिया पँथर सेना जातीय अत्याचारा विरोधात लढा देत आहे. दलित, पीडित, वंचित, शोषित, मुस्लिम, आदिवासी घटकांचा आवाज होत आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. लढाऊ पँथर्सचं संघटन वाढत असून, महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांनी योगेश थोरात यांच्या नियुक्तीच स्वागत केले आहे. विनोद भोळे (महाराष्ट्र महासचिव), हर्ष ताकसांडे (महाराष्ट्र प्रसिद्धिप्रमुख तथा प्रवक्ता) व कैलास काळे यांनी थोरातांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी असलेले व जिल्हा ठिकाणी वास्तव्यास असणारे, योगेश थोरात हे आंबेडकरी, पुरोगामी चळवळीतील खंदे समर्थक असून, सामान्यांच्या लढ्यामध्ये ते अग्रणी सहभागी असतात. दलित, आदिवासी, भटके- विमुक्त, गरीब, शेतकरी, मुजुरांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या लढ्यात ते सक्रिय पुढाकार घेत, आंदोलनाच्या भूमिकेमध्ये अनेक प्रसंगात उतरल्याचे सर्वश्रुत आहे. त्यांच्या निवडीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत केले जात आहे.
(स्रोत:ऑल इंडिया पँथर सेना,संपर्क कार्यालय, अहमदनगर.)
