दिनांक ३० जून, श्रीगोंदा:
तालुक्यातील मढेवडगाव येथील एका विद्यालयीन मुलीला भिगवण येथील ट्रक ड्रायव्हर मुलगा वारंवार छळत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीने याबाबत दिलेल्या तक्रारीनंतर सागर प्रकाश काळे राहणार भिगवन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मढेवडगाव येथील ही मुलगी श्रीगोंदा येथील एका नामांकित कॉलेजात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि- कम्युनिकेशनचे शिक्षण घेते. काही दिवसांपूर्वी या मुलीच्या घरी शेताची लेव्हलिंग करत असतांना, निघालेला मुरूम मढेवडगाव येथील उंडे नामक व्यक्तीला घेऊन जाण्यास सांगितला होता. म्हणून, मे २०२० मध्ये त्याने त्याच्या मालकीच्या हायवा ट्रक मधून हा मुरूम नेला होता. यावेळी येथे आलेला ट्रक चालक सागर प्रकाश काळे यांने नमूद मुलीला तिच्या घरी पाहिले होते. तेव्हापासून तो त्या मुलीच्या मागे सतत फिरत होता.
दरम्यान काळात तो तिचा पाठलाग करीत तिच्या विद्यालयापर्यंत येत होता. यानंतर त्या मुलीचा फोन मिळवून तो तिला त्रास देऊ लागला. फोन करून तू मला भेटायला आली नाही. तर, मी तुझ्या वडिलांना काही पण करेल. अशी धमकी देत. यानंतर नमूद कॉलेज समोर येऊन तो त्या मुलीला छेडण्याचा प्रयत्न करीत. तू माझ्या बरोबर लग्न कर.! नाहीतर, तू ज्या मुलाबरोबर लग्न करशील. तेथे येऊन मी फाशी घेईन.! असा सज्जड दम त्याने मुलीला दिला. तसेच, एकदा स्विफ्ट कार घेऊन त्याने वाईट हेतूने तिच्याशी गाडीत बसण्याचा आग्रह केला होता.

अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून मुलीने दिनांक २८ जून रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये या विकृत मानसिकतेच्या व एकतर्फी प्रेम करणाऱ्या मुला विरोध तक्रार दिली. You marry me! Otherwise, I will come to your wedding and hang you! Boy from Bhigwan kills minor girl in Shrigonda
त्या तक्रारीत तिने नमूद केले की, माहे मार्च २०२० पासून ते दिनांक २८ जून २०२१ पर्यंत, सागर प्रकाश काळे राहणार भिगवन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे याने वाईट हेतूने मी आमचे राहते घरून श्रीगोंदा येथे कॉलेजला जातानां-येतानां पाठलाग करून, तसेच त्याच्याकडील मोबाइल क्रमांकावरून माझे मोबाईलवर वेळोवेळी फोन करून, मला तू माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केलं. तर, मी तिथे येऊन फाशी घेईल.! अशी धमकी दिली आहे.
मुलीच्या फिर्यादी वरून नमूद सागर काळे याचेवर भादंवि कलम ५४(ड), ५०६ तसेच, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ११(४) व १२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्रोत:(दिनांक २८/०६/२०२१ रोजी मुलीची फिर्याद)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
