दिनांक २९ जून, श्रीगोंदा:
डोंगरात चल म्हणत, १४ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने अश्लील चाळे करीत, मिठी मारली. दोन मित्रांच्या मदतीने तिला ओढत डोंगरात नेतांना मुलीने आरडाओरड केल्याने वडील, चुलते घटनास्थळी धावत आले.. अनं अनर्थ टळला..

पिसोरेखांड परिसरातील ही घटना आहे. दिनांक २५ जून रोजी रात्री १० वाजता नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला, दबा धरून बसलेल्या किरण संजय पळसकर याने वाईट इराद्याने छेडण्याचा प्रयत्न केला. डोंगराचा चल म्हणत, तीच्याशी झटापटी केली. लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील चाळे करीत, दोन मित्रांच्या मदतीने तिला डोंगराच्या दिशेने ओढत असतांना, तिने विरोध करून, आरडाओरड केला.

त्यावर मुलीचे वडील, चुलते घटनास्थळी धावत आल्याने किरण पळसकर व त्याचे दोन अनोळखी मित्र अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. यानंतर श्रीगोंदा पोस्टेला येऊन नमूद मुलीने किरण पळसकर, पिसोरे खांड व त्याचे इतर दोन साथीदार यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली.
फिर्यादी मध्ये पीडितेने किरण ने तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल तसेच, अश्लील शिवीगाळ व जबरदस्तीचा प्रयत्न केला. असा उल्लेख केला आहे. Shrigonda .. I hugged her saying let’s go to the mountains .. I had an obscene walk with a 14 year old girl .. !!
मुलीच्या तक्रारीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भादवि कलम ३५४, ३४, ५०४, ५०६ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे ७ व ८ कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्रोत:(फिर्याद दिनांक २६/०६/२०२१)

