दिनांक २० ऑक्टोबर, श्रीगोंदा:
तालुक्यातील पारगाव येथील ३५ वर्षीय युवक राहूल गोपीनाथ रायकर याचा बेल्हे येथे पिकअप आणि हायवा ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. अपघात घडल्यानंतर हायवा ट्रकचालक गाडीसोडून पळून गेला आहे.
अहमदनगर-कल्याण महामार्गावर बेल्हे (ता.जुन्नर) येथे बाह्यवळण चौकात पिकअप व हायवा ट्रक यांची समोरासमोर जोराची धडक झाल्याने ही दुर्घटना घडली आहे.
दिनांक १९ ऑक्टोबर मंगळवार रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी हायवा चालकावर आळेफाटा पोलीस ठाण्यात भांदवी कलम ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Young man from Shrigonda dies on the spot in a horrific accident ..! The unfortunate incident in Belha ..!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राखेने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १५ जीव्ही ३६६०) आळेफाट्या वरून पारनेरच्या दिशेने जात असतांना, पारनेरला जाण्यासाठी बेल्हे गावाजवळील बाह्यवळण चौकात वळत असतानाच नगरच्या दिशेने आलेल्या व आळेफाट्याकडे जाणाऱ्या पिकअप (एमएच १६ सीसी ६९१९) अनं हायवा ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली.
या अपघातात पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाली. नमूद प्रकरणाचा पुढील तपास (पोलीस निरीक्षक) मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली (उपनिरिक्षक) राजेंद्र पवार हे करीत आहेत.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)

