पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रीगोंद्यात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..
दिनांक ९ ऑगस्ट ,श्रीगोंदा:
जि.प.कर्मचारी युनियन ४३४० शाखा श्रीगोंदाचे वतीने, पंचायत समिती अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दिनांक ९ऑगस्ट रोजी एक दिवसाचे प्रातिनिधीक स्वरूपाचे लाक्षणिक उपोषण श्रीगोंदा पंचायत समितीच्या कार्यालया समोर करणेत आले.
सदर उपोषणाला श्री नागेश लोखंडे(तालुकाध्यक्ष)भारत बोरुडे,श्री. सुनिल जाधव,श्रीम.सुनिता शिंदे,वैशाली राजगुरु,नितीन इरकर,प्रसाद कुलकर्णी,अनिल सोनवणे,श्रीकांत दातीर,साळे गणेश जाधव,वाकडे(मेजर),सदावर्ते धाडगे हे उपस्थित होते.सदर उपोषणास(माजी मंत्री)श्री.बबनराव पाचपुते, (प.स.सभापती)श्री.शहाजी हिरवे,(उपभापती)सौ.मनिषा कोठारे,दत्ता भाऊ पानसरे,(मा.सभापती)श्री.सिद्धेश्वर देशमुख तसेच,(श्रीगोंदा तालुका ग्रामसेवक संघटनेने)ही पाठींबा दिला आहे.सदर प्रलंबित मागण्या शासन स्तरावर पाठविणे बाबतीत विनंती पर निवेदन श्री.प्रशांत काळे(गट विकास अधिकारी)यांना यावेळी देण्यात आले.