रयत संकुलाच्या कर्मवीर जयंतीची रॅली २२ सप्टेंबर रोजी श्रीगोंदा शहरामध्ये मोठ्या उत्साहात काढण्यात आली.या रॅलीमध्ये महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल, श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय, महादजी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स,महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय संकुलांमधील विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.सर्वात सुरुवातीला श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाच्या झांज पथक होते.
त्यानंतर, महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलचे ‘प्लास्टिक बंदी’ वरील पथनाट्य होते.महादजी शिंदे विद्यालयाचे झांज पथक लेझीम पथक व मानवी मनोरे, तसेच विविध राष्ट्रीय महापुरुषांच्या वेशभूषा यांनी उपस्थितांची मने जिंकली.त्यापाठीमागे महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे एन.सी.सी.चे पथक होते.रॅलीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांची प्रतिमा सजवलेल्या सोनेरी रथामध्ये विराजमान झालेली होती.रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर,शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने,रयत शिक्षण संस्थेचा शंभर वर्षाचा इतिहास दर्शविणारा चित्ररथ कलाशिक्षक संतोष शिंदे,सुनील शिंदे,राऊत सर आणि कल्पना जाधव यांच्या संकल्पनेतून बनविला होता.
रयत संकुलाच्या निर्मितीमध्ये अग्रेसर असणारे,बाबुमिया बँडवाले यांच्या संगीत पथकाने वातावरण संगीतमय केले होते.या रॅलीचे नेटके नियोजन महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के,महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर,कन्या विद्यालयाच्या प्राचार्या वंदना नगरे,महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य शिंदे सर व सर्व संकुलामधील सांस्कृतिक विभागाने केले होते.