केरुबाई वसंत ठोंबरे यांचे हृदय विकाराने निधन..

दिनांक २२ सप्टेंबर,कोळगाव,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे आपल्या आई सोबत राहत,मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या.केरुबाई ठोंबरे यांचे दिनांक १२ सप्टेंबर रोजी अचानक हृदयविकाराने निधन झाले.
त्या दिवशी चक्कर आल्याने,त्यांना स्थानिक दवाखान्यात दाखल केले होते.मात्र,तेथून नगरला तात्काळ पाठवण्यात आले.जातांना रुग्णवाहिकेत त्यांचा मृत्यू झाला.या विषयी जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले.

केरुबाई ठोंबरे यांचा विवाह जेऊर (बायजा बाई),अ.नगर येथील एस.टी.ड्राइवर वसंत ठोंबरेशी झाला होता.कालांतराने काही अडचणी आल्या आणि केरूबाई आपली आई शकुंतला बाई जाधव यांच्या घरी माहेरी,येऊन राहु लागल्या.तश्या त्या मरेपर्यंत आई जवळच राहत होत्या.त्यांनी काबाडकष्ट करून त्यांच्या तीन मुलींचा विवाह केला.

केरुबाईच्या पश्चात तीन मुली,पती,आई,असा परिवार आहे.त्यांना चार बहिणी आहेत.केरुबाई च्या मृत्युपुर्वी आईलाही हृदय विकाराचा त्रास होऊ लागला होता.यासाठी सर्व बहिणी माहेरी आईच्या दवाखान्यासाठी एकत्र जमल्या होत्या.दरम्यान केरुबाईलाच सर्व बहिणी समक्ष त्रास होत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अतिशय हालाखीच्या परिस्थितीत आपल्या आई सह कुटुंबाला सांभाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला.केरूबाई चा मनमिळाऊ स्वभाव सर्व पंचक्रोशीतील लोकांना माहीत होता. त्यांच्या जाण्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आई वडिलांचे आयुष्यभर सांभाळ केल्याबद्दल अनेकांच्या तोंडी केरूबाईचा गुन गौरव करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading