जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेच्या अनुषंगाने, सर्व तालुक्यात दिवाळी सणानिमित्त फटाक्यांचे तात्पुरत्या स्वरूपात परवाने देण्याच्या जाहीर सूचना करण्यात आल्या आहेत.यानुसार विस्फोटक नियम २००८ मधील तरतुदीनुसार सन २०१९ च्या दीपावली सणानिमित्त,तात्पुरते शोभेच्या फटाके विक्रीचे परवाने देणे संबंधित सूचना करण्यात आले आहेत.
त्यानुसार,अर्ज रुपये ५ कोर्ट फी स्टॅम्प लावावे,परवाना फी रुपये ५०० फोर नंबर ५ साठी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस ० ० ७ ० या शीर्षकाखाली संगणक क्रमांक ००७०००८१०१ खालील स्टेट बँकेच्या चलनाने भरावी,व चलनाचे मुळ प्रत अर्जासोबत जोडून पाठवावी,परवाने फी चे चलन तहसील कार्यालयातून मंजूर करून घेऊन तालुका टीकानच्या स्टेट बँकेत भरता येईल,ज्या जागेत फटाके चालू करायचे आहे.त्या जागेचा नकाशा,त्यावर दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी जागा सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करून तशीस्वाक्षरी करून नाहरकत दाखला सादर करावा,स्टॉल ग्रामपंचायत हद्दीत असेल, ग्रामपंचायतीचा दाखला अथवा महानगरपालिका हद्दीत असल्यास,महानगरपालिकाची शिफारस तसेच, नगरपालिका हद्दीत असल्यास नगरपालिकेचे शिफारस,असे छावणी हद्दीत कार्यकारी अधिकारी छावणी मंडळ यांची शिफारस जोडावी,नियोजित जागा वाणिज्य प्रयोजनासाठी बिनशेती असावी,नसल्यास सक्षम अधिकाऱ्यांची तात्पुरती ऊक्त प्रयोजनासाठी बिनशेती परवानगी घेऊन सादर करावी,परवानाधारक विरुद्ध फौजदारी प्रक्रिया समितीच्या प्रकरण ८ नुसार मागील दहा वर्षात गुन्हा दाखल होऊन,त्यास शिक्षा झाली नसल्याबाबत तसेच,अर्जदारास तात्पुरता फटाका परवाना देण्यात यावा किंवा कसे याबाबत स्पष्ट अभिप्राया सह सक्षम अधिकाऱ्यांचा दाखला जोडावा,स्पोटक पदार्थांचा नियम २००८ प्रमाणे परवाना धारकाने त्यांचे व्यवसाय संस्थेची हिशोब व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे.अशा सूचना प्रत्येक परवान्याच्या अटींमध्ये दर्शविल्या आहेत.त्याप्रमाणे,ज्यांना परवाना पाहिजे,त्यांनी मागील वर्षाच्या परवान्याची व हिसोबाची माहिती अर्जासोबत सादर करावी.तसेच,परवाना फी रुपये ५०० शासकीय खजिन्यात जमा केले.म्हणजे,परवाना मिळाला असे ग्राह्य धरू नये.असे प्रशासनाने नमूद केलेले आहे.
ज्या व्यापाऱ्यांना यासंदर्भात परवाना पाहिजे असेल,अशांनी वरील सर्व बाबींची पूर्तता करून,दिनांक १२ ऑक्टोबर पूर्वी,तालुक्याच्या तहसील कार्यालयात अर्ज सादर करावेत. तशेच,परवाना तयार झाल्यानंतर येथून च परवाना घेऊन जावे. सर्व संबंधित तहसील कार्यालयात वरील नमूद बाबींची पूर्तता पाहूनच परिपूर्ण प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येईल. प्रकरण पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचा मुदतीत परवाना देण्याची जबाबदारी प्रशासनाची राहिले.अपूर्ण प्रकरण आकारले जाणार नाहीत असे प्रशासनाने नमूद केले आहे.अर्जदार यांनी तालुक्यातील तहसील कार्यालयात असाच प्रस्ताव सादर करीत तेथूनच आपले परवाने घेऊन जाण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.