दोन वर्ष्याच्या मुलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू, स्थानिक प्रशासनाची मदत न मिळाल्याने निषेध..

दिनांक १९ऑक्टोबर,(पिसोरेखांड)श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे खांड येथील पोई फाटा या परिसरातील विजय कल्याण इंगळे यांची दोन वर्ष्याची मुलगी काल दिनांक १८ ऑक्टोबर रोजी शेत तळ्यात बुडून मृत्यू झाली आहे.याविषयी स्थानिक प्रशासनास माहिती दिली आहे.मात्र कोणत्याही प्रकारची मदत पीडितांना मिळाली नाही.काल संध्याकाळ पासून सर्व नातेवाईक व संबंधित त्या तलावात मुलीचा शोध घेत आहेत.मात्र,त्यांना यश येत नाही.
यासाठी अग्निशमन व स्थानिक तहसील व पोलीस प्रशासनास कळविण्यात आले आहे.१५-१६ तास उलटूनही पीडितांना मदत मिळाली नसल्यामुळे,त्यांनी प्रशासनाचा निषेध केल्याचे समजते आहे.बहुजन समाज पार्टीचे(उमेदवार)सुनिल ओहोळ,मारुती जरे, सलीमभाई अत्तार,संजय चव्हाण,सखाराम पाळेकर यांनी निषेधाचे पत्र प्रसिद्धी माध्यमांना दिले आहे.
याविषयीची माहिती श्रीगोंदयाचे तहसीलदार महेंद्र माळी(महाजन)यांना विचारली असता,मदती विषयी सूचना देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading