भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित चेतन अल्हाटचा मृत्यू…

फुफसात संसर्ग झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू..

दिनांक २४ डिसेंबर(पारगाव श्रीगोंदा):
१जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या, दंगलीचे पडसाद संपूर्ण देशभर पाहण्यास मिळाले होते.या ठिकाणी झालेल्या दगडफेक व जाळपोळीत परिसरात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान,नमूद ठिकाणी एका युवकाचा जमावाकडून खून झाल्याचे समोर आले होते.त्या गुन्ह्यातील संशयित म्हणून,पारगाव,तालुका,श्रीगोंदा येथील तीन युवकांना तपासादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले होते.तसे,हे तिघे साधारण दोन वर्षापासून येरवडा येथील कारागृहात कैदेत होते.नमूद प्रकरण न्याय प्रविष्ट असून,भीमा कोरेगावची घटना सर्वश्रुत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ,दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी चेतनसह आणखी एक युवकाची जामीनवर कैदेतून सुटका झाली होती.येरवडा येथून घरी आल्यापासून चेतन आजारी असल्याचे त्याच्या घरच्यांचे म्हणणे आहे.त्याला किरकोळ सर्दी व ताप येत असल्याचे समजते आहे.दिनांक ६ डिसेंबर रोजी पारगाव या आपल्या गावी आल्यानंतर,त्याची तब्येत खराब होत असल्याचे कुटुंबातील लोकांकडून समजले.
शनिवार दिनांक २२ डिसेंबर रोजी चेतनला अचानक चक्कर आली आणि तो खाली पडला.त्यावर नातेवाईकांनी त्याला श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले.मात्र,तेथे उपचार होणार नसल्याने,मोठ्या दवाखान्यात डॉक्टरांनी हलवण्यास सांगितले.नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता, तेथूनही त्यास ससून येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला.दिनांक २२ डिसेंबर रोजी चेतनला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,दुसऱ्या दिवशी दिनांक २३ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान चेतनचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या अभिप्रया मध्ये जिवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गामुळे चेतनच्या फुफसात प्रादुर्भाव झाल्याने,त्याचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.जेलमधील व बाहेरील वातावरणात बदल झाल्यानेही असे होऊ शकते,असे त्यांचे म्हणणे आहे.शिवाय हा आजार निमोनिया सदृश्य असून,बऱ्याच दिवसांपासून शरीरात भिणला असल्यास असे होऊ शकते.असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
नमूद प्रकरण न्यायालयात असल्याने,याविषयी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास चेतनच्या आईने व नातेवाईकांनी नकार दिला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading