व्यक्तीचे मूल्यमापन सुविचारावर होण्याऐवजी,त्याच्या कडील पैश्यावर करणारा मतप्रवाह ,
पत्रकारिता कार्यकाळाचे सिंहावलोकन..
पुन्हा कार्यरत झाल्यास.चाटुगिरी,भडवेगिरी,दलाली,हमाली,बातम्याचोर,आत्मभान संपलेल्या पत्रकारांपासून दूर राहनार..
वाचकहो ….
महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर कार्यक्षेत्रात पोटाची भूक भागविन्यासाठी पंजाब,दिल्ली,मुम्बईसह,पुणे याठिकाणी केलेली खटाटोप आजही ध्यानात आहे.मात्र,पैश्याबरोबर माणसाला आत्मसन्मानहि आवश्यक आहे.ह्या झालेल्या जाणीवेतून,उपजीविकेचे मार्ग बंद करून,सन २००८ साली पत्रकारितेचा कोर्स सुरु केला.उद्देश सरळ आणि सोपे होते.सामन्य,पददलितांच्या व्यथा जगासमोर मांडणे….पूर्ण विश्वासाने आणि आत्मभान जागृत करून नमूद करतो कि,पत्रकारिता सुरु करण्यापूर्वी मागासवर्गीय,भटकी-विमुक्त समाजाच्या अश्या अनेक घटना घडल्या ,ज्या समाज प्रवाहात उजेडात येणे गरजेचे होते.परंतु,निव्वळ वर्चस्ववादी भूमिका मांडणाऱ्या,बहुतांश वृत्तपत्रांमुळे त्या घटना उजेडात येऊ शकल्या नाहीत.हि मोठी शोकांतिका होती. समाजासाठी काम करणे,आपले आद्य कर्तव्य मानित,बाबासाहेबांच्या विचारसरणीला स्मरून व आत्मसात करून,पत्रकारिता सुरु केली होती.हे आजही विसरू शकणार नाही.
आज जवळपास १० वर्ष्याहून अधिक काळ सामान्य समजाच्या व्यथा मांडण्यासाठी बहुजन समता पत्र या मासिकाने व दैनिक सम्राट वर्तमान पत्राच्या माध्यमातून खर्चिला आहे.यात सक्रीय राहण्याचा प्रयत्न करीत,गेल्या दोन वर्ष्यापासून बहुजन समता पत्र या मासिकाचे आर्टिकल 17 हे news पोर्टल चालू करून, मुख्यत्वे समाज प्रवाहात मागे असलेल्या घटकांच्या अन्याय अत्याचारांना वाचा फोडण्याचे काम केले आहे. कार्यक्षेत्रात बहुजन समता पत्र मासिक म्हणजे,सर्वसामान्य माणसांचे वर्तमानपत्र,असा शिक्कामोर्तब झाला. असे म्हणणे वावगे ठरणार नाही. actrosity च्या प्रकरणात इतर वृत्तपत्रे आरोपींची बाजू मांडत असतांना कोणत्याही शक्तीची पर्वा न करतां,बहुजन समता पत्राने पिडीतासह त्याच्या सत्य बाजून उभा राहण्यास कधीही हयगय केली नाही. या मासिकाच्या तत्कालीन बातम्यांचा आढावा घेतल्यास पुरोगामी, आंबेडकर वादी,चळवळीशिवाय दुसरे काहीच आढळनार नाही. वास्तविक आणि सत्य लिखाण हीच आमच्या लेखणीची भूमिका राहिलेली आहे.दिग्गज म्हणविणाऱ्या वृत्तपत्रांपुढे सातत्य आणि विश्वासहर्तत्ता कधीही गमऊ दिली नाही.
दरम्यान कालखंडात आपल्या वलयात वाढलेल्या,बांडगुळानीं अनेक वेळा दुय्यम दर्जा देण्याचा प्रयत्न केला.मुळात कोणाच्या रेमार्क ने कोणाची गुणवत्ता ठरत नाही.मात्र,ज्याची पत्रकारिता शब्द लिहण्याची लायकी नाही.अश्या अज्ञानी लोकांना पत्रकारितेत केलेली मदत,जाती आधारावर गणली गेली.आपल्या वर्तमानपत्रात व पोर्टल वर प्रकशित करण्यात आलेल्या बातम्या चोरून अनेकांनी आपले वर्तमानपत्रे चालवली.आमचा आक्षेप नाही.परंतु,अश्या उस्ठ खाणाऱ्यांना,स्थानिक प्रशासनाकडून पहिल्या रांगेत खुर्ची आणि मानपान ? तर दलित,आदिवाशी,भटकी,विमुक्तांच्या बहुआयामी विषयांना वाचा फोडणाऱ्यानां,दुय्यम वागणूक ? बहुतांश पेपर आपली भूमिका मांडताना.आपले पत्र आजही सामन्याच्या प्रश्नासाठी आग्रही आहे.ज्या समाजात आपला जन्म झाला.त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणे.आपले कर्तव्य जरी असले.तरी,देणाऱ्याने देत रहावे.घेणाऱ्याने घेत जावे.घेता घेता घेणाऱ्याने,देणाऱ्याचे हातच घ्यावे.अशी भूमिका असणारे अनेक जन निदर्शनास आल्याने,आपल्या कामाची गती खुंटत आहे.चांगल्या कामात मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी पडत आहेत.त्यामुळे बहुजन समता पत्राच्या कामकाजाचे सिंहावलोकन करणे गरजेचे झाले आहे.या वृत्तपत्राच्या व आर्टिकल 17 च्या माध्यमातून निर्भीड,अन्वयार्थक व वास्तवादी पत्रकारिता करण्याचा,गेल्या अनेक वर्ष्यांपासून प्रयत्न असून,पुन्हा या क्षेत्रात उतरताना, चाटुगिरी, भडवेगिरी,दलाली,हमाली,बातम्याचोर,आत्मभान संपलेल्या पत्रकारांपासून दूर राहत,फक्त आणि फक्त फुले आंबेडकरांच्या विचारातील पत्रकारिता करावी लागेल.असा निकष डोळ्यासमोर ठेवावा लागणार असल्याचे आंतरमन सांगत आहे.
सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तीचे मूल्यमापन सुविचारावर होण्याऐवजी,त्याच्या कडील पैश्यावर करणारा मतप्रवाह निर्माण झाला असल्याने,कितीही चागले आणि जनकल्याणाची कामे अश्या विचारसरणीत पोसलेल्यांसाठी चुकीचीच ठरतात अशे माझे मत आहे.यासाठी बदल अपेक्षित आहे.
संधी मिळाल्यास बहुजन समता पत्र नवीन आचारसंहितेसह पुन्हा लवकरच कार्यरत होण्याचा प्रयत्न करील..
जय भीम…..
