कुकडीचे आवर्तन आज पासून सुरू : बबनराव पाचपुते.

घोड, विसापूर बाबत नगरच्या बैठकीत निर्णय.

दिनांक २ जानेवारी,श्रीगोंदा:

कुकडी प्रकल्पातून रब्बी हंगामातील पिकांसाठी तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी आपण नागपूर अधिवेशन काळात केली होती. या मागणीचा विचार करून आज (दि.१) संध्याकाळी कुकडीचे आवर्तन सुटणार असल्याची माहिती,माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या संदर्भात श्री.पाचपुते यांनी म्हटले आहे की,”यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने,कुकडी प्रकल्पातील धरणे भरली आहेत. कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यां साठी पूर्ण हंगामाचे एकदाच नियोजन करावे,यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. त्याच बरोबर कुकडीचे रब्बी आवर्तन तातडीने सोडण्यात यावे.अशी ही आग्रही मागणी केली होती.दरम्यानच्या काळात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात या संदर्भात संबंधितांशी बैठक पार पडली आहे.”

या सर्वांचा परिणाम म्हणून,आज संध्याकाळी (दि.१) कुकडीचे आवर्तन सुटणार आहे. टेल टू हेड हे आवर्तन असेल. पाण्याचे शेतकऱ्यांनी जपून वापर करावा , सर्वानां पाणी मिळण्याचे नियोजन केले आहे.त्याच प्रमाणे घोड, विसापूरच्या आवर्तना बाबत उद्या (दि. २) नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेणेबाबत आग्रही भूमिका मांडणार आहे .त्यामुळे घोड व विसापूरचे देखील आवर्तन लवकर सुटेल,अशी अपेक्षा ही श्री.पाचपुते यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading