नवीन दशकाची सुरूवात झाली तशी त्यासोबतच सुरू होणार देशात असणाऱ्या भारतीय नागरिकांच्या नावाच्या नोंदणीचे काम. दरम्यान, जनगणना करताना आता कोणकोणते प्रश्न विचारले जाणार याविषयी सर्वांनाच उत्सूकता असणार आहे? दरम्यान जनगणना कर्मचारी आपल्या घरी आल्यानंतर कुठले प्रश्न विचारतील त्याविषयीची ही माहिती.
* इमारत क्रमांक (पालिका किंवा स्थानिक अधिकृत क्रमांक) काय? * घर क्रमांक काय? * घराचे बांधकाम करताना छत, भिंती आणि सिलिंगमध्ये मुख्यत्वे वापरण्यात आलेले साहित्य कोणते? * घराचे बांधकाम कोणत्या कारणासाठी होत आहे ? * घराची स्थिती काय? * घराचा क्रमांक किती? * घरात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या किती? * कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे? * कुटुंबप्रमुख स्त्री आहे की पुरुष? * कुटुंबप्रमुख अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती किंवा इतर समाजातील आहेत का? * घराच्या मालकी हक्काची स्थिती काय आहे? * घरातील खोल्यांची एकूण संख्या किती? * घरात किती लग्न झालेली जोडपी राहतात? * पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत काय आहे? * घरात पाण्याच्या स्त्रोताची उपलब्धता काय? * वीजेचा मुख्य स्त्रोत काय? * शौचालय आहे कि नाही? * कोणत्या प्रकारचे शौचालय आहे? * ड्रेनेजची व्यवस्था आहे का? * घरात वॉशरुम आहे की नाही? * स्वयंपाक घर आहे की नाही, त्यात एलपीजी किंवा पीएनजीची जोडणी आहे किंवा नाही? * स्वयंपाक घरात स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे इंधन कोणते? * घरात रेडियो किंवा ट्रान्झिस्टर आहे का? * टेलिव्हिजन सेट आहे का? * इंटरनेटची सुविधा आहे की नाही? * लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर आहे की नाही? * टेलिफोन किंवा मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन आहे का? * सायकल किंवा स्कूटर किंवा मोटरसायकल किंवा मोपेड आहे का? * कार किंवा जीप किंवा व्हॅन आहे का? * घरात मुख्यत्वे कोणत्या धान्याचा खाण्यासाठी वापर केला जातो? * मोबाईल क्रमांक (जनगणनेसंबंधी संपर्कासाठी)