विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञाना बरोबरच आर्थिक ज्ञान घेणे गरजेचे आहे:-गोरख उंडे.
दिनांक १५ जानेवारी(मढेवडगाव,श्रीगोंदा) :
“न्यु इंग्लिश स्कुल माध्यमिक विद्यालय”, मढेवडगाव आयोजीत ‘करिअर डे’ च्या निमित्ताने व्यवसाय मार्गदर्शन आणी भूगोल दीनानिमित्त आयोजीत कार्यक्रमा मध्ये प्रमुख वक्ते म्हणून श्री गोरख जी उंडे यांनी विद्यार्थ्यांना उद्याच्या उज्वल भविष्याचे मार्गदर्शन केले, खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे जे काही स्वप्नं असतील, गोल्स असतील ते पूर्ण करण्यासाठी,आत्ता पासूनच सुरवात करायला हवी.जे ने करून कमी कालावधीच तुम्ही तुमचे स्वप्नं पूर्ण करू शकता.त्या बरोबर आई वडील यांचे मने जिंकू शकता.
सकारात्मक द्रुष्टी कोणाच्या बळावल जे झेप घेतात. त्यांचीच कर्तुत्वाची शिखरे त्यांच्या पायावर लोटांगण घालतात.त्याचीच प्रेरणा आपण विद्यार्थी ठरत असतो. विद्यार्थ्यांनी कायम सकारात्मक विचार ठेवला पाहिजे. कारण विद्यार्थी हा सर्वांचा आदर्श असतो.त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरू करून,पैशे कमावण्यास सुरवात करा. असे अनेक विचार या ठिकाणी उंडे यांनी प्रेरित केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक कोरडे सर,यदलोड सर , शिंदे सर , हिंगसे सर , नलगे सर , घोडे सर,ननवरे सर विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थीत होते …