महामानवांचा खरा इतिहास समाजा समोर मांडण्याची गरज :डॉ रफीक सय्यद.
दिनांक १७ जानेवारी(आढळगाव,श्रीगोंदा):
आपापसात बंधुभाव व सदभावना निर्माण करीत, महामानवाची जयंती केल्याचे सार्थक होईल.असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.रफीक सय्यद यांनी केले.”महामानव विचार प्रबोधन यात्रा व सदभावना विचार मंच” यांच्यावतीने शिक्षणाची आद्य देवता सावित्रीमाई फुले,राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त आढळगांव येथे दिनांक १२ जानेवारी रोजी आयोजित सांगता कार्यक्रमात डॉ.सय्यद बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.शकुंतला दरवडे होत्या. डॉ.पुढे म्हणाले या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य निर्माण केले.त्यांना माँ जिजाऊ या आदर्श शिक्षकामुळे व त्यांच्या संस्कारा मुळे हे शक्य झाले.ज्योतिबा फुले व सावित्रिमाई फुले यांनी शिक्षणाच्या माध्यमातु न परिवर्तन घडवन्याचा प्रयत्न केला.परीवर्तन म्हणजे आदर्श समाज घडवने. समाजामध्ये आग लावनारा,खोटारडा इतिहास पुसून टाकन्याची व खरा इतिहास समाजासमोर ठेवण्याची गरज आहे.
शिवरायांचे अंगरक्षक मुस्लिम होते.विश्वासु सैनिक मूस्लिम होते.राजांनी रायगडावर मशीद बांधली होती. शिवराय मुस्लिम द्वेष्टे नसून ते कुलवाड़ी भूषन आणि बहुजन प्रतीपालक होते.आज शिवजयंती वेळी हजारो मुस्लिम भगिनी बुरख्यामध्ये मिरवनुकीत सहभागी होत आहेत.
महात्मा फुले यांनी दोन पोवाडे तयार केले. कुलवाड़ी भूषण शिवाजी महाराज व मोहम्मद पैगम्बर यांची महती समाजाला सांगन्यासाठी,राजानी रयतेसाठी केलेले काम व पैग़म्बरानी घड़ावलेल्या महान क्रांत्या त्यांचे योगदान यावर त्यांनी जहाँमर्द मोहम्मद हा पोवाड़ा तयार करुन खरा इतिहास सांगन्याचा प्रयत्न केला.त्या प्रमानेच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांनी अरबी भाषेमधील कुरान सर्वाना समजन्यासाठी राजकोशांतुन त्यावेळी पंचवीस हजार रुपये शासकीय अनुदान दिले होते.
यावेळी संभाजीराव बोरूडे,जा.तु.घोडके,मुकूद सोनटक्के, धोत्रे महाराज आदीनी प्रबोधन केले. सलग दहा दिवस चाललेल्या या उत्सवाची सांगता झाली. प्रबोधनाचा तालुक्यातील श्रोत्यांनी आनंद घेतला.डॉ. सय्यद मित्र मंडळाच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले.अनिल ठवाल यानी उपस्थितांचे आभार मानले.