हिराबाई जाधव यांचे कार्य दीपस्तंभा सारखे: प्रा चव्हाण..

दिनांक १३ फेब्रुवारी,जामखेड:
जेष्ठ लोककलावंत हिराबाई जाधव यांनी अँँड.डॉ. अरूण जाधव यांच्या सारखा धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता नगर जिल्ह्याला दिला. आपल्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम केले.त्यांचे हे कार्य समाजाला दिपस्तंभासारखे प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन वंचीत बहुजन आघाडीचे(प्रदेश सरचिटणीस)प्रा.किसन चव्हाण यांनी केले.
वंचित बहुजन आघाडीचे(अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष)अँँड.अरूण जाधव यांच्या मातोश्री तथा जुन्या पिढीतील जेष्ठ लोक-कलावंत हिराबाई जाधव यांचे शनिवार दिनांक.८/२/२०२० रोजी जामखेड येथे निधन झाले.त्यांचावर रविवारी तपनेश्वर स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी आयोजीत श्रद्धांजली सभेत चव्हाण(सर) बोलत होते.
यावेळी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक व फुले-शाहु-आंबेडकरी चळवळीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.याप्रसंगी अनेकांनी हिराबाई जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading