८४ परप्रांतीय मजुर श्रीगोंदा बस स्थानकातून एस.टी.द्वारे अहमदनगर रेल्वे कडे रवाना.

(मूळगावी जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाची व्यवस्था..)

दिनांक १३ मे,श्रीगोंदा:

आज दि. १३ मे रोजी श्रीगोंदा तालुक्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश येथील ८४ परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी श्रीगोंदा बसस्थानकातून सायंकाळी ठीक ५:१५ वाजता ४ एस.टी. बसेसमधून अहमदनगर रेल्वे स्थानकापर्यंत पुढील रेल्वे प्रवासासाठी पाठविण्यात आले.

यावेळी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे व सोशल डिस्टंशिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. सर्व परप्रांतीय मजूरांना जेवणाची फूड पँकेटस व पाणी बाँटल देण्यात आली. यावेळी परप्रांतीय मजूरांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान पाहण्यास मिळाले.

तसेच मा. जिल्हाधिकारी सो. अहमदनगर यांच्या आदेशाने श्रीगोंदा आगारातील ३ एस टी बसेस अहमदनगर येथून मध्यप्रदेश साठी ,१ एस टी बस अहमदनगर येथून छत्तीसगड साठी, १ एस टी बस अहमदनगर येथून कर्नाटक साठी मोफत पाठविण्यात आल्या.

यावेळी श्रीगोंदा निवासी नायब तहसिलदार योगिता ढोले , श्रीगोंदा आगार व्यवस्थापक श्री. प्रविण शिंदे ,वाहतूक निरीक्षक श्री.रोहित रोकडे ,पो.कॉ. अविनाश ढेरे, पो.कॉ. संतोष कोपनर, प्रशांत होले, राजेंद्र साबळे, संदिप चौधरी,बाळू तवले, राजेंद्र जगताप तसेच महसूल व परिवहन विभागाचे कर्मचारी तसेच एस. टी. बस चालक संतोष मेहत्रे,अशोक साळवे, संतोष गावडे, संजय लवांडे, सदाशिव जगताप, विशाल जोगदंड, पोपट पांढरे, दत्तात्रय जेधे,सतिश नन्नवरे, अरुण नन्नवरे, मधुकर क्षिरसागर इ.नियोजनासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading