हिंदू हृदयसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने श्रीगोंद्यात भव्य शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा..

दिनांक ६ मार्च २०२६,श्रीगोंदा:

हिंदू हृदयसम्राट प्रतिष्ठानच्या वतीने श्रीगोंदा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

प्रतिमा पूजन ह भ प भूषण महाराज महापुरुष, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, मनोहर दादा पोटे, नगरसेवक योगीराज गाडे, नगराध्यक्ष सुनीताताई खेतमाळीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

शहरातील शनिचौक येथील आनंद टावर समोर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शिवजयंती उत्सवाला शिवप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत सर्वसामान्यांना न्याय देणारे राज्य निर्माण केले. त्यांच्या शौर्य, धैर्य आणि दूरदृष्टीमुळे आजही तरुण पिढीला प्रेरणा मिळत असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या कार्यक्रमाचे आयोजन हिंदू हृदयसम्राट प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब दूतारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी यामध्ये बबन दादा पाचपुते, अत्तर भाई शेख, पांडुरंग पोटे, शिवाजी समदडे, हरिभाऊ काळे, संतोष चिकलठाणे, नितीन लोखंडे, सागर खेडकर, गणेश लाटे, ओमकार शिंदे, मीराताई खेंडके, दिपाली ताई राऊत, जनाबाई गायकवाड, दीपक मखरे सर्व पक्षाचे नगरसेवक सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

शिवजयंती उत्सवानिमित्त उपस्थितांना शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याबाबत माहिती देण्यात आली तसेच समाजात एकोपा, बंधुभाव आणि राष्ट्रप्रेम वाढवण्याचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

https://www.amazon.in/dp/B0DGCVG67C/ref=cm_sw_r_as_gl_apa_gl_i_dl_J8HG5QY9S5WPCZ96Y039?linkCode=ml1&tag=nirbhidkalam-21&linkId=81c4effba7fe3be07df27153b0c90413

शहरात शिवजयंती उत्सवामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading