दिनांक १६ मे,श्रीगोंदा:
निलेश भाऊ घायवळ मित्र मंडळाच्या वतीने शास्त्रीनगर, पुणे, कोथरूड जामखेड तसेच श्रीगोंदा भागातील गरीब तसेच निराधार लोकांना मदतीचा हात पुढे करून निलेश भाऊ घायवळ यांनी सामाजिकता जोपासली आहे.
तसेच, जामखेड तालुक्यात पाण्याचे टँकर तसेच जामखेड मधील अनाथ आश्रमातील मुलांना ही मदतीचा हात दिला. जवळा खर्डा गटात सॅनिटायझर फवारणी करणार असल्याचे सांगितले. आधीच कोरोनच संकट त्यातच निसर्गाच्या लहरी पणामुळे अवकाळी पावसाने आणि वादळाने शेतकरी अगदी मेटाकुटीला च आला पण निलेश भाऊंनी या सर्वांना आधार आणी धीर देत नुकसान झालेल्या फळबागांचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळवा.असे आदेश स्थानीक प्रशासनाला दिले.
कोरोन संकटाने संपुर्ण देश नव्हे तर पुर्ण जगच स्वतःबरोबर मृत्यूला घेऊन धाडसाने त्यावर मात करताना दिसत आहे आणि अशाच परिस्थती काही माणसं आपण ही समाजाच काहीतरी देणं लागतो. याच नात्याने अनेक गरीब तसेच निराधारांच्या डोळ्यातील अश्रु पुसण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते जमेल त्या प्रकारे या सर्वांना आधार आणि मदत करत आहेत.
यामध्येच निलेश भाऊ यांनी स्वखर्चातून गोर गरिबांना किराणा किट तसेच मास्क सॅनिटायझर हे साहित्य देऊन, त्यांना कोरोना या लढाईत तुम्ही एकटे नसून,मी आपल्या सर्वांच्या बरोबर आहे. घाबरून जाऊ नका.मी सर्वोत्तपरी आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. हा विश्वास त्यांना दिला. हे सर्व कार्य केल्यानंतर तेथील स्थनिकांच्या डोळ्यातील अश्रु अनावर झाले आणि त्यातीलच काही लोकांनी साक्षात देव भेटल्याचीच भावना व्यक्त केली.
