फक्त किराणा व्यावसायिक खुश तर,इतर दुकान चालक नाराज: राजेश डांगे.

दिनांक १५ मे,श्रीगोंदा:

लॉक डाऊन काळात लोक सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत. म्हणून, प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांना आठवड्यातून २ दिवस उघडण्यास सांगितले. पण, यातील गॅरेज, ऑटोमोबाईल या दुकानात गर्दी होण्याचे कारण नसल्याने, वरील सेवा पुरविणारे तसेच दुकानांना दररोज दुकाने उघडण्याची परवानगी देण्याची मागणी नगरसभा आंदोलनाचे अध्यक्ष राजेश डांगे यांनी केली आहे.

डांगे म्हणाले या व्यतिरिक्त दुय्यम निबंधक कार्यालय चालू झाले.पण टायपिंग करणारी दुकाने २ दिवस उघडली.तर लोकांना अडचण येणार. शिवाय परराज्यात जाणारे लोक पासेस साठी येत आहेत. त्यांच्यासाठीही उघडे ठेवण्याची गरज आहे. सर्वच दुकाने २ दिवसच उघडणार असल्याने लोक गर्दी करणार.त्यामुळे सोशल डिस्टन्स नियम पाळून दररोज दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. असे सांगून अनेक दुकान चालक भाड्याने गाळा घेऊन व्यवसाय करत असल्याने, त्यांना भाडे भरणे मुश्कील होणार आहे.

आठवड्यात २ दिवस वेगवेगळी दुकाने उघडण्यास सांगितल्याने लोकांना दररोज घराबाहेर पडावे लागणार याकडेही डांगे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. अश्यात फक्त किराणा व्यावसायिक खुश तर इतर दुकान चालक नाराज आहेत.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading