श्रीगोंद्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार: आरोपी अटकेत, पीडिता हिंदू आणि आरोपी अल्पसंख्यांक असल्याने सामाजिक तणावाची भीती..?

दिनांक ३० जानेवारी २०२५, श्रीगोंदा:

श्रीगोंद्यात एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये १९ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि आरोपी युवक हे एकमेकांच्या शेजारी राहतात. दोन दिवसांपूर्वी आरोपीने मुलीला बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचे मुलीने तिच्या आईला सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यात काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संपत कन्हेरे व पीएसआय आहेरे करत आहेत. घटनास्थळी सखोल तपास करून पुरावे गोळा करण्यात येत असून आरोपीविरुद्ध  कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या घटनेत पीडित मुलगी हिंदू असून आरोपी अल्पसंख्यांक समुदायातील आहे. या घटनेमुळे तालुक्यातील सामाजिक वातावरण ढवळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाने सावध भूमिका घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

ससाणे नगर मधील खून प्रकरण आणि दिनांक पाच फेब्रुवारी रोजी श्रीगोंद्यात हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी एकत्र येत पीडित ससाने कुटुंबाला भेटून घटनेचा निषेध करणार असल्याने.. संबंध तालुक्यासह संघटनांचे लक्ष आता या घटनेने वेधले आहे.

स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

जाहिरात..

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading