दिनांक ४ फेब्रुवारी २०२५, श्रीगोंदा:
आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा स्मृतिदिन श्रीगोंदा बाजार तळ महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर अंकुशराव ढवळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उमाजी नाईक यांच्या जीवनकार्याचा गौरव करत बहुजन समाजापर्यंत त्यांच्या आणि बहिर्जी नाईक यांच्या इतिहासाची माहिती पोहोचवण्याची गरज व्यक्त केली.

मेजर ढवळे यांनी उमाजी नाईकांच्या क्रांतिकारक योगदानावर सखोल माहिती देत त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाला शिवसेना (शिंदे गट) जिल्हा उपाध्यक्ष संतोष शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष नाना शिंदे, जय मल्हार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप भोईटे, श्रीगोंदा सोसायटीचे संचालक अनिलराव ननवरे, ज्येष्ठ नेते अशोकराव बगाडे, सुशीलजी खराडे, युवा अध्यक्ष लखन ननवरे, नामदेव ननवरे, पांडुरंग मदने, बोला खराडे, गणेश गांजुरे, विठ्ठल ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी उमाजी नाईकांच्या कार्याचा आदर व्यक्त करत सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी त्यांची शिकवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise..
