अग्नीपंख फौंडेशनकडून कर्जत येथील स्नेहप्रेम वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप; लेकरांच्या चेहऱ्यावर उमलले हास्य..

दिनांक १६ जुलै २०२५,कर्जत:

श्रीगोंदा येथील अग्नीपंख फौंडेशन यांच्या पुढाकाराने कर्जत शहरातील स्नेहप्रेम वसतीगृहातील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके आणि सॅग यांचे वाटप करण्यात आले. शालेय जीवनात आनंद निर्माण व्हावा, शिक्षणात अडथळा येऊ नये यासाठी अग्नीपंख फौंडेशनने हे साहित्य प्रेमपूर्वक भेट दिले. या उपक्रमामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले.

ही साहित्य वाटप शालेय पोषण आहार योजनेचे श्रीगोंदा तालुका निरीक्षक सत्यजित मच्छिंद्र, रमेश सांळुके यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी अग्नीपंख फौंडेशनचे विश्वस्त राजकुमार इथापे, अमोल गव्हाणे, नानासाहेब घाडगे, कैलास घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना श्री. सांळुके म्हणाले, “सन २००८ पासून फारुख बेग यांनी स्नेहप्रेम संस्थेच्या माध्यमातून कर्जत शहरात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक नवा आधार निर्माण केला आहे. शिक्षणाचा हा उजेड गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे मोठे कार्य संस्थेमार्फत सुरू आहे. अशा संस्थेला अग्नीपंख फौंडेशनकडून मिळालेली मदत लाखमोलाची आहे.”

स्नेहप्रेम संस्थेचे संस्थापक फारुख बेग म्हणाले, “अग्नीपंख फौंडेशनने यापूर्वीदेखील आमच्या संस्थेला विविध प्रकारे मदतीचा हात दिला आहे. आता शालेय साहित्याच्या रूपाने जे सहकार्य मिळाले आहे ते अत्यंत मोलाचे व प्रेरणादायी आहे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार इथापे यांनी केले.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Advertise…

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading