लिंपणगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह निमित्त कृषी चर्चा सत्र

दिनांक २ जुलै (लिंपणगाव,श्रीगोंदा):

राज्याच्या कृषी विभागाने १ जुलै ते ७ जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताह आयोजित करण्याचे ठरवले आहे. याच कार्यक्रमाचा भाग म्हणून श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा यांच्या वतीने कृषी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

खरीप हंगामामध्ये शेतकरी विविध पिकांची पेरणी करतात. पेरणीच्या कालावधीमध्ये त्यांना पिकांच्या लागवडीबाबतची माहिती बीज प्रक्रिया तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषी संजीवनी सप्ताह हे अभियान चालू केले आहे.

आज लिंपणगाव येथे या अभियानाच्या माध्यमातून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राज्यांमध्ये कोरोना सदृश्य परिस्थिती असल्याने कोरोना बाबत आवश्यक ती काळजी घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

chandan ghodke848510538770414127..jpg

यावेळी (कृषी सहाय्यक) संतोष झेंडे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच बीज प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास (सरपंच) रवी उजागरे, उपसरपंच पोपट माने, दादासाहेब कुरुमकर, प्रवीण कुरुमकर, नानासाहेब होले, बबनराव बडवे, आदी उपस्थित होते.

(स्रोत:कृषी विभाग,श्रीगोंदा मार्फत प्रसिद्धीस मिळालेली माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading