महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी सोहेल शेख..

दिनांक २ जुलै, श्रीगोंदा:

श्रीगोंदा येथील युवा पत्रकार सोहेल आमीन शेख यांची महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामिण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांनी नुकतेच शेख यांना निवडीचे पत्र देवून तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

दैनिक श्रीगोंदा सिटीझन चे कार्यकारी संपादक म्हणुन काम करत असताना, शेख यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत वंचितांना लेखणीतुन न्याय देण्याची चोख भुमिका बजावली आहे. श्रीगोंदा तालुक्यासह त्यांनी जिल्ह्यात पत्रकारांची मोठी टीम उभी केली आहे.

Advertise

पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल (माजी मंत्री) आ. बबनराव पाचपुते, (माजी आ.) राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, (नगराध्यक्षा) सौ. शुभांगीताई पोटे, नगसेवकांसह पत्रकार सहकारी मित्रांनी त्यांचे अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

(स्रोत:राजमहंमद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading